शिल्पा शेट्टीने मोडला मंदिराचा नियम; व्हायरल फोटो आणि व्हिडिओमुळे नेटकऱ्यांचा संताप
शिल्पा शेट्टीने भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिरात फोटोग्राफीवर बंदी असताना देखील तिने फोटो आणि व्हिडिओ काढले. यामुळे तिच्यावर तीव्र टीका होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्याकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

शिल्पा शेट्टी नेहमी आपल्या सोशल मीडियावर बरिच सक्रिय असते. ती कुठेही फिरायला गेली किंवा कार्यक्रमांना केली तरी ती सोशल मीडियावर सर्वकाही अपडेट देत असते. चाहते तिच्या फोटो आणि व्हिडीओवर नेहमी चांगला प्रतिसाद देतात. पण शिल्पा एका व्हिडीओ आणि फोटोंमुळे चांगलीच ट्रोल झाली आहे.शिल्पाने चक्क मंदिराचे नियम धाब्यावर बसवत बंदी असतनाही देवाचे आणि मंदिराचे फोटो व व्हिडीओ काढले आहेत.
मंदिराचा नियम मोडला
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने भुवनेश्वरमध्ये ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनावेळी लिंगराज मंदिराला भेट दिली. मात्र,मंदिरात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवर सक्त बंदी असतानाही मंदिराच्या आवारात फोटो काढले, हे फोटो सोशल मीडिावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
- Shilpa Shetty breaks temple rules: Netizens furious after viral photo and video
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्यांना मंदिराचे महत्त्व समजावून सांगत आहे. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ती चागंलीच वादात सापडली आहे.
परवानगी दिलीच कशी, नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित
जेव्हा शिल्पाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला तेव्हा लोकांनी तिच्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली, “आतमध्ये फोटो कसे काढले आणि जर कोणी तिला तसे करण्याची परवानगी दिली असेल तर ती व्यक्ती कोण आहे? लिंगराज मंदिर 11 व्या शतकातील आहे, त्याचे पावित्र्य राखण्यासाठी लोकांनी मंदिराच्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.
- Shilpa Shetty breaks temple rules: Netizens furious after viral photo and video
असे असताना फोटो आणि व्हिडीओ काढण्याची परवानगी कशी दिली?” असे अनेक सवाल लोकांकडून उपस्थित केले जात आहेत.वाद सुरू झाल्यापासून अभिनेत्रीच्या टीम आणि मंदिर संकुलाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य केलेल नाही.
स्थानिक ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी गेली होती शिल्पा
दरम्यान शिल्पा भुवनेश्वरला एका स्थानिक ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनासाठी गेली होती. मंदिरात जाताना त्यांनी गळ्यात सोन्याचा वजनाचा सेटही घातला होता. याच दरम्यान 28 ऑक्टोबरला शिल्पा शेट्टीने लिंगराज मंदिराला भेट दिली. यावेळी शिल्पाने मंदिराच्या आवारात क्लिक केलेले फोटो काढले आणि व्हिडिओही बनवला. फोटो आणि व्हिडिओ आता चांगलाच वादाचा मुद्दा बनला आहे.