AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीव दिला असता, तरी लोक हसले असते..; मराठी अभिनेत्रीने सुनावलं, ट्रोलर्सना म्हणाली ‘भुंकत राहा..’

अभिनेत्री शिल्पा शिंदेनं तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेच्या निर्मात्यांवर खोटे लैंगिक शोषणाचे आरोप केल्याची कबुली तिने दिली होती. त्यानंतर तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

जीव दिला असता, तरी लोक हसले असते..; मराठी अभिनेत्रीने सुनावलं, ट्रोलर्सना म्हणाली 'भुंकत राहा..'
शिल्पा शिंदेImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2026 | 8:36 AM
Share

‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. दहा वर्षांपूर्वी निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे ती या मालिकेतून बाहेर पडली होती. मात्र तेव्हा तिने निर्मात्यांवर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप खोटे होते, असा धक्कादायक खुलासा तिने कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्ट मुलाखतीत नुकताच केला. यानंतर नेटकऱ्यांनी आणि काही सेलिब्रिटींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलर्ससाठी शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत उत्तर दिलं आहे.

या व्हिडीओमध्ये शिल्पा म्हणाली, “मी सहसा कमेंट्स वाचत नाही, कारण माझे चाहते माझ्याविषयी काय लिहिणार हे मला माहीत आहे. माझ्याविरोधात सध्या तो पीआर चालवला जातोय, त्या लोकांना इतकंच म्हणेन की जे पेराल, ते उगवेल. परिस्थिती समजून न घेता तुम्ही काहीही लिहित आहात. सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला खोटं म्हणत आहात. अशा प्रतिक्रिया येणार, हे मला आधीपासूनच माहीत होतं. हे जग चांगल्या गोष्टीचं कौतुक करत नाही. विशेषकरून तुमच्यासारखे लोक, जे अशा प्रकारचे कमेंट्स करतात. मला आज बोलायची काही गरज नव्हती. दहा वर्षांनंतरही मी मालिकेत काम करतेय. मी तेव्हासुद्धा बोलू शकत होते. तेव्हा जर मी बोलली असती, तर मालिकेसाठी बोलतेय असा आरोप केला असता. मला फरकच पडत नाही. मला तुमच्या नजरेत चांगली व्यक्ती बनायचंच नाहीये. मी माझ्या नजरेत चांगली आहे. मला कोणीच बोललं नव्हतं की जाऊन खरं सांग.”

शिल्पा शिंदेचा व्हिडीओ

“माझ्यासोबत जे घडलं, ते तुम्हाला माहीत नाही. तुमच्या कुटुंबीयांसोबत चुकूनही असं घडू नये. कारण ती वेळ कशी होती, हे फक्त मला माहीत आहे. मी पैशांसाठी असं केलं नाही. मी ती मालिका आधीच सोडली होती. बिग बॉसनंतर एका व्यक्तीने माझ्याकडे येऊन सांगितलं, की त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. कारण त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना खूप बरंवाईट म्हटलं गेलं होतं. मीसुद्धा तेच करणार होतो आणि त्यासाठी सूसाइड नोट लिहित होतो. तेव्हा मला तुझा व्हिडीओ दिसला आणि मी आज तुझ्यामुळे जिवंत आहे. ज्या व्यक्तीवर आरोप असतात, त्यालाच ती गोष्ट माहीत असते. सॉरी हा शब्द त्या व्यक्तीसाठी खूप छोटा आहे. माझ्याकडे त्यावेळी दुसरा कोणताच मार्ग नव्हता”, असं म्हणत शिल्पा भावूक होते.

या व्हिडीओमध्ये ती पुढे म्हणते, “मी स्वत: त्यावेळी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होते. पण तरीही लोक माझ्यावर हसले असते आणि शिव्या दिल्या असत्या. पण जेव्हा तुम्ही चुकीचे नसता, तेव्हा तुम्हाला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. मला त्यावेळीही कोणी पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे मला आजही कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही. मी ट्रोलिंगसाठी तयार आहे. जे खरंच निर्मात्यांना त्रास देतात, शिवीगाळ करतात, ते 10-15 वर्षे काम करून जातात. पण माझ्यासारखे कलाकार मूर्ख ठरतात. आम्हाला सत्याने जगायचं असतं. जे भुंकत आहेत, त्यांनी भुंकर राहावं. मला काही फरक पडत नाही.”

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन