कॅनडामध्ये कपिल शर्माच्या 3 दिवसांपूर्वी उघडण्यात आलेल्या कॅफेवर गोळीबार; या दशहतवादी संघटनेनं घेतली जबाबदारी

कॉमेडियन कपिलच्या कॅनडा कॅफेवर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा कॅफे तीन दिवसांपूर्वीच उघडण्यात आला होता. मात्र एका दहशतवादी संघटनेकडून हा गोळीबार करण्यात आल्याचं वृत्त आहे.

कॅनडामध्ये कपिल शर्माच्या 3 दिवसांपूर्वी उघडण्यात आलेल्या कॅफेवर गोळीबार; या दशहतवादी संघटनेनं घेतली जबाबदारी
kapil sharma cafe
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2025 | 6:57 PM

कॉमेडियन कपिल शर्माबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कपिलच्या कॅनडा कॅफेवर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कपिलचा हा कॅफे नुकताच उघडण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी एक माणूस कॅफेच्या खिडक्यांमधून गोळीबार करताना दिसत आहे. तो माणूस एका कारमध्ये आहे आणि हा व्हिडिओही तिथूनच बनवला गेल्याचं समोर आलं आहे.

कपिलचा हा कॅफे कॅनडातील सरे भागात आहे

कपिलचा हा कॅफे कॅनडातील सरे भागात आहे. काही दिवसांपूर्वी हा कॅफे उघडण्यात आला होता. कपिलच्या या कॅफेमध्ये लोकांची मोठी गर्दीही दिसून आली होती. गोळीबाराचा हा व्हिडिओ रात्रीचा असून त्यामध्ये एक कार चालक कॅफेच्या खिडक्यांवर गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलने जबाबदारी घेतली

वृत्तानुसार खालिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल गँगने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. या प्रकरणात बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेशी संबंधित दहशतवादी हरजीत सिंग उर्फ ​​लड्डीचे नाव समोर येत आहे. लड्डी हा एक कुख्यात दहशतवादी आहे आणि त्याचे नाव यापूर्वी अनेक घटनांमध्ये समोर आले आहे. लड्डीचा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश आहे.एनआयए (भारत) च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, बीकेआय ऑपरेटिव्ह, हरजीत सिंग लड्डी यांनी कपिल @SurreyPolice यांच्या काही वक्तव्यांचा हवाला देत ही गोळीबाराची घटना घडल्याचा दावा केला आहे

कॅफे तीन दिवसांपूर्वी उघडला होता

कपिलचा कॅफे सुरू होऊन फक्त तीन दिवस झाले आहेत. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी सोशल मीडियावर कॅफेचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. कपिल शर्मा हे इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे, अशा परिस्थितीत गोळीबारसारख्या खळबळजनक घटनेने परिसरातील सर्वांनाच हादरवून टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेकडे इशारा म्हणून पाहिले जात आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणातील सर्व माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.