Shreya Ghoshal: म्युझिक कॉन्सर्टनंतर श्रेया घोषालचा आवाजच गेला; चाहत्यांना बसला धक्का!

| Updated on: Nov 22, 2022 | 8:26 AM

कॉन्सर्टनंतर श्रेया घोषाने अचानक गमावला आवाज; चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Shreya Ghoshal: म्युझिक कॉन्सर्टनंतर श्रेया घोषालचा आवाजच गेला; चाहत्यांना बसला धक्का!
Shreya Ghoshal
Image Credit source: Instagram
Follow us on

फ्लॉरिडा: प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल तिच्या बहुप्रतिक्षित म्युझिक कॉन्सर्टसाठी गेल्या काही दिवसांपासून फ्लॉरिडामध्ये आहे. मात्र ऑरलँडो इथल्या कॉन्सर्टनंतर आवाज पूर्णपणे गमावल्याचा धक्कादायक खुलासा तिने सोशल मीडियावर केला. अमेरिकेतल्या ऑरलँडो याठिकाणी श्रेयाचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. सुदैवाची बाब म्हणजे, उपचारानंतर श्रेया आता ठीक आहे. डॉक्टरांच्या मदतीने आवाज पुन्हा मिळवल्याचं तिने या पोस्टमध्ये सांगितलं.

एखाद्या गायक किंवा गायिकेसाठी त्यांचा आवाजच सर्वस्व असतो. यासाठी त्यांना अनेकदा खाण्या-पिण्याच्या सवयींवरही नियंत्रण ठेवावं लागतं. गायनक्षेत्रात वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचे अमेरिकेत सात म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. न्यूजर्सी, डलास, वॉशिंग्टन डीसी, बे एरिया, लॉस एंजिलिस, ऑरलँडो आणि न्यूयॉर्क अशा विविध ठिकाणी श्रेयाच्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

18 नोव्हेंबर रोजी श्रेयाने ऑरलँडो इथल्या एडिशन फायनान्शिअल एरेनामध्ये परफॉर्म केलं होतं. मात्र याच कॉन्सर्टनंतर तिने तिचा आवाज पूर्णपणे गमावला होता. श्रेयाने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित याविषयीची माहिती दिली.

श्रेया घोषालची पोस्ट-

‘मी आज खूपच भावूक झाले. मी माझ्या बँडवर, कुटुंबीयांवर, माझ्या टीमवर खूप प्रेम करते. यांनी माझ्या चांगल्या आणि वाईट काळात माझी साथ दिली. परिस्थिती कुठलीही असली तरी मी कुठेच कमी पडू नये यासाठी माझी मदत केली’, असं तिने लिहिलं.

‘काल रात्री ऑरलँडोमध्ये पार पडलेल्या कॉन्सर्टनंतर मी माझा आवाज पूर्णपणे गमावला होता. माझ्या शुभचिंतकांच्या प्रार्थनांमुळे आणि डॉक्टरांच्या मदतीने मी ठीक झाले. न्यूयॉर्क एरेनामध्ये मी तीन तासांसाठी गाऊ शकले’, असं तिने पुढे म्हटलंय.

श्रेया घोषाल ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायिकांपैकी एक आहे. तिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. ‘सा रे ग म प’ या रिॲलिटी शोमधून तिने तिच्या गायनाच्या करिअरची सुरुवात केली होती. या शोचं विजेतेपदही तिने पटकावलं होतं.