Ganeshotsav: डीजे वादात श्रेयस तळपदे याचं मोठं वक्तव्य, असं काय बोलून गेला अभिनेता?

Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या आधीच डीजे वाद टोकाला पोहोचला आहे. यावर अभिनेता श्रेयस तळपदे याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेच आहे.

Ganeshotsav: डीजे वादात श्रेयस तळपदे याचं मोठं वक्तव्य, असं काय बोलून गेला अभिनेता?
अभिनेत्री श्रेयस तळपदे
| Updated on: Sep 09, 2026 | 1:09 PM

Ganeshotsav: राज्यातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव… गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. सा भाविक गणपती बाप्पाला घरी किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये आणून दहा दिवस भक्तिभावाने पूजा करतात, आरती करतात आणि शेवटी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. पण त्याआधीच डीजे वाद टोकाला पोहोचला आहे. यावर अभिनेता श्रेयस तळपदे याने मोठं वक्तव्य केलं आहे… ‘सण साजरे केलेच पाहिजे, मात्र लोकांना त्रास होऊ नये… आपल्या सणांचे वेगळे वैशिष्ट्य आहे. त्याचं वेगळं गांभीर्य आहे…’

डीजे वादावर श्रेयस तळपदे म्हणाला, ‘सण तर आपले साजरे करायलाच हवेत, पण त्याचा त्रास लोकांना होईल असं शक्यतो आपण काही करायला नको. सण साजरे करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे आणि ऐवढे सगळे आपले सण आहेत, त्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. त्याचे वेगळे गांभीर्य आहे… ते समजून लोकांना त्रास होणार नाही. याची काळजी आपण घेतली पाहिजे. असं देखील श्रेयस तळपदे म्हणाला.

सांगायचं झालं तर, गेल्या काही वर्षांपासून सणांनं एक वेगळं स्वरुप प्राप्त झालं आहे. उत्सवात डीजे आणि मोठ्या ध्वनिवर्धकांचा वापर वाढल्याने ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर अनेकांनी आक्षेप देखील घेतला आहे. गणेशोत्सव डीजे नको… अशी मागणी अनेकांनी केली आहे. पुण्यात तर याच मुद्द्यावरून दोन मतप्रवाह दिसून येत आहे.

एकीकडे उत्सवाचा आनंद वाढवण्यासाठी डीजे हवा असा युक्तिवाद होतो, तर दुसरीकडे कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि शांततेवर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार केली जाते.  विशेषतः तरुणांमध्ये डीजेची लोकप्रियता मोठी असल्याने अनेक आयोजक उत्सव अधिक आकर्षक करण्यासाठी त्याचा आग्रह धरतात.

मात्र, कर्णकर्कश आवाजामुळे वृद्ध, लहान मुले आणि आजारी नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. ध्वनिप्रदूषणामुळे आरोग्य आणि शांततेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्सवाचा उत्साह कायम ठेवत ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करून मर्यादित आवाजात डीजे वाजवावा, अशी मागणी होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us