AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी चंद्रकांत शिंदेंचा मृत्यू, फायनान्स कार्यालयाला सील, तीन संशयित ताब्यात अन्…; नांदेड प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?

Nanded Farmer Death Case: फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहे. पोलिसांची कारवाईत नवे धागेदोरे सापडले आहेत.

शेतकरी चंद्रकांत शिंदेंचा मृत्यू, फायनान्स कार्यालयाला सील, तीन संशयित ताब्यात अन्...; नांदेड प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?
| Updated on: Oct 25, 2026 | 4:01 PM
Share

नांदेडमधील अल्पभूधारक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. फायनान्स कंपनीच्या कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू केला आहे. फायनान्स कंपनीच्या कर्जवसुलीच्या पद्धतीवरून माळकौठा गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांना माळकौठा गावातून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपहरण करून नांदेडमधील कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. शनिवारी शहरातील हिंगोली गेट परिसरातील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. यानंतर वजिराबाद पोलीस ठाण्यात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चंद्रकांत शिंदे यांचे शवविच्छेदन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह माळकौठा गावात आणण्यात आला. कुटुंबीयांनी केलेल्या आक्रोशाने गावात शोककळा पसरली. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी अकरा पथके स्थापन केली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची सहा आणि वजिराबाद पोलिसांची दोन पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

अन्य तपासासाठी तीन पथके तैनात आहेत. तीन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. नवा मोंढा परिसरातील कुबेरफल नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयातही पोलीस आणि उपनिबंधक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. कार्यालयाच्या मुख्य शटरचे कुलूप तोडून कागदपत्रांची झाडाझडती घेण्यात आली. तपासात ‘KF’ म्हणजे खालसा फायनान्स नव्हे, तर कुबेरफल फायनान्स असल्याची माहिती पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे, खालसा फायनान्सचे कार्यालय पोलिसांनी सील केले आहे. तेथील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. नांदेडचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी माळकौठा गावात जाऊन शिंदे कुटुंबीयांची भेट घेतली. आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. फायनान्स कंपनीचा जाच थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

फायनान्स कंपनीकडून आठ हजार रुपयांचे कर्ज घेतलेले नागेश कोंकेवाड आणि दत्ता गायकवाड हे दोन तरुण बेपत्ता असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. नागेश तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांकडून माहिती घेतली. या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि संशयितांची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.

Follow Us
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी