AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमविवाहाच्या रागातून नवरदेवाला थेट पेटवून…., येवल्यात लग्नमंडपातच भयंकर प्रकार

नाशिकमधील येवल्यामध्ये एक भयंकर प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर आता पोलिसांकडून गुन्हा नोंंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नेमकं काय घडल?

प्रेमविवाहाच्या रागातून नवरदेवाला थेट पेटवून...., येवल्यात लग्नमंडपातच भयंकर प्रकार
Nashik CrimeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 3:35 PM
Share

येवला शहरात भरलग्नात तुफान राडा झाला आहे. प्रेमविवाहाच्या रागातून लग्नमंडपात हाणामारी करण्यात आली आहे. नवरदेव आणि नातेवाईकांना डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवरदेव व नवरीच्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीत ७ ते ८ जण जखमी झाले आहेत. लग्नातील राड्याचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांची घटनास्थळी धाव घेतली आहे. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं?

राज्यात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. प्रेमविवाहाच्या रागात लग्न मंडपातच मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील येवला शहरामध्ये घडली आहे. यावेळी ऐन लग्नमंडपामध्ये मोठा राडा होऊन तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीदरम्यान थेट नवरदेवालाचा पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्त झाल्याचा गंभीर प्रकारचा आरोप करण्यात आला आहे. नवरदेवाच्या नातेवाईकांनाही यावेळी डिझेल ओतून त्यांना जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आल्याने याप्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या हाणामारीमध्ये तब्बल ७ ते ८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व तुंबळ हाणामारीचा प्रकार कॅमेरातही कैद झाला आहे. लग्नातील सर्व राड्याचा व्हिडिओ पोलिसांनाही सुपूर्द करण्यात आला आहे.

सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाईला सुरुवात केली. येवला शहर पोलिसांकडून या प्रकरणी तातडीची कार्यवाही करण्यात येत आहेय संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दोन्ही बाजूंनी गुन्हा नोंदवण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे.

Follow Us
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी