Siddhant Chaturvedi-Navya Naveli | ‘दो दिल मिल रहे है’; अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत ‘गली बॉय’ची मूव्ही डेट

सिद्धांतने ‘गली बॉय’, ‘गेहराईयाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2019 मध्ये त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याआधी त्याने ‘लाइफ सही है’ आणि ‘इनसाइड एज’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं.

Siddhant Chaturvedi-Navya Naveli | दो दिल मिल रहे है; अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत गली बॉयची मूव्ही डेट
Siddhant Chaturvedi and Navya Naveli Nanda
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 15, 2023 | 10:07 AM

मुंबई : ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा आहेत. या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर कबुली दिली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिद्धांत आणि नव्याला एकत्र पाहिलं जात आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांना गोव्याहून परत येताना पापाराझींनी पाहिलं. त्यानंतर आता सिद्धांत आणि नव्या हे मुंबईतील एका मल्टिप्लेक्समध्ये मूव्ही डेटला जाताना दिसले. पापाराझींनी या दोघांचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. क्षणार्धात हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सिद्धांत-नव्याची मूव्ही डेट

‘नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदीची ही मूव्ही डेट आहे. आम्ही मुंबईतील एका मल्टिप्लेक्सबाहेर या दोघांना पाहिलंय’, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धांत आणि नव्या एकमेकांसोबत चालताना दिसत आहेत. नव्याने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पँट घातली आहे. तर सिद्धांतने कॅज्युअल पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातली आहे. यावेळी सिद्धांतने त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावला होता. या महिन्याच्या सुरुवातीला पापाराझींनी सिद्धांत आणि नव्याला मुंबई विमानतळावर एकत्र पाहिलं होतं. हे दोघं गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेऊन मुंबईत परतले होते, असं म्हटलं जात होतं. त्यावेळी दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडेसुद्धा परिधान केले होते.

पहा व्हिडीओ

डेटिंगबाबत सिद्धांतची प्रतिक्रिया

सिद्धांतने ‘गली बॉय’, ‘गेहराईयाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2019 मध्ये त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याआधी त्याने ‘लाइफ सही है’ आणि ‘इनसाइड एज’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. एका मुलाखतीत सिद्धांतला डेटिंगविषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “मी कोणाला तरी डेट करतोय, ही बाब खरी असावी अशी माझीसुद्धा इच्छा आहे.”

चर्चांना उधाण

सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर केलेल्या कमेंट्समुळे सिद्धांत आणि नव्या डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. नव्या एका हिल स्टेशनला फिरायला गेली होती. त्यावेळी तिने छतावर बसल्याचा फोटो पोस्ट केला होता. ‘चंद्राने फोटो काढला’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. तर दुसरीकडे सिद्धांतनेही त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. सिद्धांतच्या फोटोवर नव्याने सूर्याचा इमोजी पोस्ट करत कमेंट केली होती. सिद्धांतने ऋषीकेशमधील काही व्हिडीओसुद्धा पोस्ट केले होते. या व्हिडीओमध्ये ज्या छतावर नव्या बसली होती, तसंच दृश्य नेटकऱ्यांनी पाहिलं. ‘अपना मन और मून दोनो क्लिअर’, असं कॅप्शन सिद्धांतने व्हिडीओला दिलं होतं. या सर्व गोष्टींचा अंदाज बांधत नेटकऱ्यांनी नव्या आणि सिद्धांतच्या रिलेशनशिपवरून कमेंट्स करायला सुरुवात केली होती. या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु झाल्यानंतर नव्याने तिच्या फोटोवरील कमेंट एडिट केलं आणि सिद्धांतच्या फोटोवरील तिची कमेंट डिलिट केली होती.