‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थ करतोय अदिती रावला डेट? पहिल्यांदाच फोटो केला पोस्ट

'भावाला वहिनी भेटली', सिद्धार्थ-अदितीच्या फोटोवर नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स

रंग दे बसंती फेम सिद्धार्थ करतोय अदिती रावला डेट? पहिल्यांदाच फोटो केला पोस्ट
सिद्धार्थ, अदिती राव
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2022 | 6:04 PM

मुंबई- ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ हा बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीला डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र या दोघांनी अद्याप त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अदितीच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थने पहिल्यांदाच तिच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे हे दोघं लग्न करणार आहेत का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सिद्धार्थने अदितीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘हृदयाच्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे सर्व लहान, मोठे आणि न पाहिलेली स्वप्नंसुद्धा पूर्ण होवोत’, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे. सिद्धार्थने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये दोघांचा पारंपरिक पोशाख पहायला मिळतोय. अदितीने सिद्धार्थच्या खांद्यावर हात ठेवून फोटोसाठी पोझ दिली आहे.

सिद्धार्थच्या या पोस्टवर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. झहीर इक्बाल, नकुल मेहता यांनी हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर ‘तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘भावा, वहिनी भेटली तुला’ असं दुसऱ्याने लिहिलं.

सिद्धार्थ आणि अदिती हे ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वीच या दोघांना मुंबईत एकत्र पाहिलं गेलं होतं.

सिद्धार्थचं नाव याआधी बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. समंथा रुथ प्रभू, सोहा अली खान आणि श्रुती हासन यांचंसुद्धा सिद्धार्थसोबत नाव जोडलं गेलं होतं. 2003 मध्ये सिद्धार्थने बालमैत्रीण मेघनाशी लग्न केलं होतं. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us