Sidharth Malhotra Injured : सिद्धार्थच्या पायाला दुखापत, सोशल मीडियावरील पोस्ट पाहून चाहते चिंतेत

Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्रा लौकरच दुसऱ्यांदा बाबा बनणार आहे.यामुळे चाहते आनंदात असताना, अभिनेत्याने एक बॅड न्यूज शेअर केली आहे. सिद्धार्थच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याची माहिती त्याने स्वत:च दिली.

Sidharth Malhotra Injured : सिद्धार्थच्या पायाला दुखापत, सोशल मीडियावरील पोस्ट पाहून चाहते चिंतेत
| Updated on: Oct 13, 2026 | 5:09 PM

Sidharth Malhotra : बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या ‘द वन’ या चित्रपटाचं यश एन्जॉय करतोय. या चित्रपटाला क्रिटीक्स आणि प्रेक्षक यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या फिल्ममध्ये त्याच्यासोबत तमन्ना भाटिया ही देखील दिसली. एकीकडे प्रोफेशनल आयुष्यात यश अनुभवत असताना, त्याच्या पर्सनल आयुष्यातही गुड न्यूज आहे. सिद्धार्थ लौकरच दुसऱ्यांदा बाबा बनणार आहे. किआरा आणि तो दुसऱ्या बाळाची वाट बघत असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली होती. मात्र याच दरम्यान एक टेन्शन वाढवणारी बातमी देखील आहे. सिद्धार्थने नुकताच एक असा फोटो शेअर केला, ज्यमुळे चाहते चांगलेच चिंतेत आहेत. खरंतर सिद्धार्थच्या पायाला दुखापत झाली आहे.

सिद्धार्थने त्याच्या दुखापत झालेल्या पायाचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला. मात्र त्यासोबत त्याने विनोदी अंदाजात एक कॅप्शनही लिहिली आहे. त्याचा हा फोटो पाहून फॅन्स खूप चिंतित झाले आहेत आणि त्याला लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहेत. सिद्धार्थला नेमकं लागलं कसं, काय झालं ? जाणून घेऊया.

Loading...

सिद्धार्थला नेमकं कसं लागलं ?

सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या पायाला मेडिकल वॉकिंग बूट लावलेला दिसतोय. हा फोटो शेअर करताना त्याने मजेशीरपणे लिहीलं की,, “ब्रेक अ लेग” ही म्हण मी जरा जास्तच गांभीर्याने घेतली… यासोबत सिद्धार्थने हॉस्पिटलचा इमोजीही वापरला आहे. मात्र, अभिनेत्याच्या पायाला नेमकी दुखापत कशी झाली आणि त्याची प्रकृती कशी आहे, याबाबत त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. दुखापत झाली असतानाही सिद्धार्थ हे थोडं मजेत घेताना दिसतोय.

कुटुंबासोहत नुकतेच शेअर केले होते फोटो

अलीकडेच सिद्धार्थ पत्नी कियारा अडवाणी आणि मुलगी सरायाहसोबत सुट्टीसाठी गेला होता. तेथील अनेक फोटो कियाराने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने आपल्या मुलीचा चेहरा लपवला होता. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर तिच्या चिमुकल्या पायांची झलक तिने दाखवली होती. एका फोटोमध्ये कियारा तलावाजवळ बसून उन्हाचा आनंद घेताना दिसत होती, तर दुसऱ्या फोटोमध्ये समुद्रकिनाऱ्यावर कुटुंबातील सदस्यांच्या पावलांचे ठसे दिसत होते.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारी 2023 साली राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली होती. जुलै 2025 मध्ये त्यांच्या घरी लाडक्या लेकीचा, सरायाहचा जन्म झाला. आता ऑक्टोबर 2026 मध्ये या दोघांनी पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us