बच्चन कुटुंबाबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा, सिमी ग्रेवालने दिली प्रतिक्रिया, थेट ऐश्वर्या राय हिच्याकडे…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने बॉलिवूडला अनेक हीट चित्रपट दिली आहेत. नुकताच ऐश्वर्या राय हिला तिच्या अभिनयाबद्दल पुरस्कार देखील मिळाला. ऐश्वर्यावर काैतुकाच्या वर्षाव होताना दिसतोय.

बच्चन कुटुंबाबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा, सिमी ग्रेवालने दिली प्रतिक्रिया, थेट ऐश्वर्या राय हिच्याकडे...
Bachchan family
| Updated on: Sep 26, 2024 | 12:36 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर काही रिपोर्टमध्ये तर सांगण्यात आलंय की, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट देखील झालाय. सतत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच त्यावर अजिबातच भाष्य हे बच्चन कुटुंबियांकडून करण्यात नाही आले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी देखील यावर भाष्य केले नाहीये. हेच नाही तर अनंत अंबानी याच्या लग्नात देखील ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. दुसरीकडे अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन, अभिषेक बच्चन, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा हे सर्वजण एकत्र पोहोचले.

ऐश्वर्या राय ही विदेशात सतत जाताना दिसत आहे. मात्र, यावेळी तिच्यासोबत बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच दिसत नाही. आताच काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय हिला SIIMA 2024 हा पुरस्कार मिळाला. मात्र, यावेळी बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्याला देखील ऐश्वर्या ही आपल्या लेकीसोबतच पोहोचली होती.

आराध्या बच्चन आपल्या आईचे काैतुक करत फोटो तिच्या मोबाईलमध्ये घेताना दिसली. हेच नाही तर ना अभिषेक बच्चन ना अमिताभ बच्चन यांच्यापैकी कोणीच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ऐश्वर्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा देताना दिसले नाहीत. बच्चन कुटुंबियांकडून ऐश्वर्या हिच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.

इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ सध्या शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंब ऐश्वर्या राय हिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे हायलाइट करण्यात आले. हा व्हिडीओ सध्या तूफान चर्चेचा विषय नक्कीच ठरलाय. हेच नाही तर या व्हिडीओवर सिमी ग्रेवाल हिने प्रतिक्रिया दिलीये. यावर तिने अत्यंत मोठे भाष्य केले आहे. 

सिमी ग्रेवाल प्रतिक्रिया देत म्हटले आहे की,  तुम्हाला काही कळत नाही….थांबा. Reddit ने त्याचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यानंतर तो चर्चेत आला. बच्चन कुटुंबियांमध्ये सर्वकाही अलबेल सुरू नसल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडला असून ती आपल्या आईच्या घरी शिफ्ट झाल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us