मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

Asha Bhosle Heart Attack : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सध्या त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

मोठी बातमी! प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल
Asha Bhosale
Image Credit source: Google
बापू गायकवाड | Updated on: Apr 11, 2026 | 9:20 PM

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सध्या त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर सध्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात उपचार सुरू आहेत. अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालय प्रशासनामार्फत दिली गेली आहे.

ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाने जादू निर्माण करणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्याबाबत ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. 11 एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे, मात्र यापेक्षा अधिक माहिती अद्याप उपलब्ध नाही.

Loading...

कुटुंबाकडून माहिती देण्यात आलेली नाही

आशा भोसले यांना हॉर्ट अटॅक आल्यानंतर पॅपराझी रुग्णालयाबाहेर पोहोचले आहेत, मात्र कुटुंबीयांकडून त्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या बातमीमुळे आशा भोसले यांच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे. त्यांनी संगीत क्षेत्रात मोठे नाव कमावले असून त्यांच्या गाण्यांना लोकांकडून मोठी पसंती मिळते. त्या गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात सक्रिय आहेत.

हजारो गाणी गायली

आशा भोसले यांनी 1948 साली सावन आया या गाण्याद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, जे चुनरिया या चित्रपटातील गाणे होते. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 16000 गाणी गायली आहेत. त्यांनी केवळ हिंदीच नव्हे तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन अशा अनेक भाषांमध्येही आपल्या आवाजाची छाप पाडली आहे. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यासह जगभरात त्यांचा चाहता वर्ग आहे.

आर डी बर्मन यांच्याशी लग्न

आशा भोसले यांनी बॉलीवूडमधील दिग्गज संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्याशी विवाह केला होता. ते स्वतःही संगीत क्षेत्रातील सुपरस्टार होते आणि हिंदी चित्रपटांमधील त्यांचे संगीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. आशा भोसले यांनीही 2200 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या सुरांची जादू दाखवली आहे. त्यांना 2008 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांनी अनेक पुरस्कार आणि सन्मान आपल्या नावावर केलेले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us