उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये महिलेला केलं Lip Kiss! नेटकऱ्यांमध्ये संताप, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

Udit Narayan: 'तो' व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल लाज.. लाईव्ह शोमध्ये उदित नारायण यांनी महिलेला सर्वांसमोर केलं Lip Kiss! व्हिडीओ तुफान व्हायरल... व्हिडीओ अनेकांनी व्यक्त केला संताप...

उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये महिलेला केलं Lip Kiss! नेटकऱ्यांमध्ये संताप, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
| Updated on: Feb 01, 2025 | 12:14 PM

Udit Narayan Viral Video: सोशल मीडियावर सध्या गायक उदित नारायण यांचा एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना संताप देखील व्यक्त करत उदित नारायण यांनी असं का केलं? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. लाईव्ह शो सुरु असताना उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या ओठांवर उदित नारायण यांनी किस केलं. शोमधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये किती तथ्य आहे… समोर आलेलं नाही.

उदित नारायण यांचे व्हायरल होणारे व्हिडीओ फेक आहेत. असं अनेकांचं म्हणणं आहे. तर अनेकांनी मात्र त्यांच्यावर संताप व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडीओनुसार, उदित नारायण ‘टिप टिप बरसा’ गाणं गात आहेत. तेव्हा एका महिला चाहत्यांनी उदित नारायण यांना घेरलं आणि त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करु लागल्या. याच दरम्यान उदित नारायण यांनी एक महिलेला किस केल्याचं दिसत आहे.

 

 

उदित नारायण यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर व्हायरल होत असलेला व्हिडीओ फेक असून AI जनरेडेट आहे… असं देखील अनेकांचं म्हणणं. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

व्हिडीओवर कमेंट करत एक युजर म्हणाला, ‘उदित नारायण… थांबा सर’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काय गैरवर्तन आहे, उदित नारायण खरंच असं करू शकतात?’ अनेकांनी उदित नारायण यांच्यावर संताप व्यक्त केला, तर अनेकांनी त्यांची बाजू घेतली आहे.

 

 

उदित नारायण यांचे चाहते म्हणाले, ‘उदित नारायण असं करु शकत नाही. कदाचित AI असू शकतं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘व्हिडीओ AI आहे असं कृपया म्हणा…’, सध्या सोशल मीडियावर उदित नारायण यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. पण यावर उदित नारायण किंवा त्यांच्या कुटुंबियांनी मौन बाळगलं आहे.