Pune News | पुणे येथे तिरंग्याचा अपमान, प्रसिद्ध गायिकेवर FIR दाखल; Video व्हायरल

Pune News | 'आमचा तिरंगा ही आमची ओळख...', पुणे येथे तिरंग्याचा अपमान केल्यामुळे संतापाचं वातावरण, प्रसिद्ध गायिकेवर FIR दाखल... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...; व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल...

Pune News | पुणे येथे  तिरंग्याचा अपमान, प्रसिद्ध गायिकेवर FIR दाखल; Video व्हायरल
| Updated on: Aug 16, 2023 | 8:49 AM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात नागरिक स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत होते. सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींनी देखील स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल झाले. एवढंच नाही तर, सोशल मीडिया युजर्सने त्यांच्या कलेच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन साजरा केला. सामान्य जनता, सेलिब्रिटी, सोशल मीडिया यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण असताना एका प्रसिद्ध गायिकेवर भारतीय तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र गायिकेची चर्चा सुरु आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे.

ज्या गायिकेवर तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या गायिकेचं नाव उमा शांती असं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे प्रकरण पुणे येथील आहे. १४ ऑगस्ट रोजी मुंडवा परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये उमा शांती म्युझिक बँडसोबत परफॉर्म करत होती. तेव्हा उमा शांती हिने असं काही केलं ज्यामुळे आता गायिकेला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

व्हिडीओमध्ये गायिका दोन्हा हातात तिरंगा फडकवत परफॉर्म करताना दिसत आहे. त्यानंतर तिने तिरंगा प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावला. गायिका तिच्या या कृतीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी उमा शांती आणि कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, दोघांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. सोशल मीडीयावर संबंधीत व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. म्हणून याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शुभा शर्मा या ट्विटर अकाउंटवरून व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करत युजरने कॅप्शनमध्ये, ‘आमचा तिरंगा ही आमची ओळख आहे… संघर्ष केलेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. असंख्य सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने आमचा तिरंगा उंच फडकत आहे… पुण्यातील हे कृत्य योग्य नाही…. या ठिकाणी आम्ही न्यायाची मागणी करतो..’ एवढंच नाही तर शुभा शर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील टॅग केलं आहे.