
Love Life: अभिनेत्री पासून केंद्रीय मंत्री पर्यंतचा प्रवास करणाऱ्या स्मृती ईराणी आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील त्यांच्या भुमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता पुन्हा नव्याने मालिका चाहत्यांच्या भेटीस आली आहे. स्मृती इराणी यांनी मॉडेल म्हणून प्रवास सुरु केला. या काळात त्यांनी रेस्टॉरंटमध्ये देखील काम केलं आहे. आज स्मृती ईराणी यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्या…
झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करत असताना स्मृती ईराणी यांची ओळख जुबिन ईराणी यांच्यासोबत झाली. जुबिन आणि स्मृती ईराणी पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले नाहीत. तर त्या संघर्ष करत होती. त्या उदरनिर्वाहासाठी पैसे कमवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि अधिक पैसे कमवण्यासाठी त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये फरशी पुसण्याचं काम देखील केलं. या काळात त्यांची जुबिन यांची ओळख मोना ईराणीशी मैत्री झाली. घट्ट मैत्री झाल्यामुळे तिघे एकत्र फिरु देखील लागले होते.
सांगितलं जातं की, जुबिन आणि मोना यांच्यामध्ये प्रेम बहरलं आणि दोघांनी लग्न केलं. अशात स्मृती ईराणी बाजूला झाल्या आणि त्यांनी करीयरकडे लक्ष केंद्रित केलं. पण काही वर्षांनी जुबिन आणि मोना यांच्यामध्य वाद सुरु झाले. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
जुबिन यांच्या घटस्फोटाबद्दल कळताच स्मृती यांनी मित्रासोबत बोलण्यास सुरुवात केली. अशात दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न केलं. स्मृती ईराणी यांच्यासोबत लग्न करण्याआधी जुबिन यांनी त्यांच्या आईची परवानगी घेतली होती. स्मृती ईराणी यांच्या आईने देखील दोघांच्या लग्नासाठी होकार दिला होता.
स्मृती आणि जुबिन यांचं लग्न मार्च 2001 मध्ये बंगाली रितीरिवाजांनुसार झालं. अभिनेत्रीनं म्हटलं होतं की, जुबिनची गरज असल्यामुळे मी लग्न केलं. मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत लग्न केल्यानंतर स्मृती ईराणी सावत्र आई देखील झाल्या.
स्मृती इराणी यांनी एका मुलाखतीत सांगितं होतं की, जुबिन यांनी पहिली पत्नी मोना आणि त्यांची मुलगी शॅनेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्या अजूनही मैत्रिणी आहेत. सावत्र मुलीच्या लग्नात स्मृती यांनी सर्व विधी पार पाडल्या.