श्रीदेवी आणि मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूशी निगडित 3 विचित्र योगायोग; जाणून व्हाल थक्क

श्रीदेवी आणि मॅथ्यू पेरी यांच्या निधनाबद्दल 3 हैराण करणाऱ्या गोष्टी... दोघांच्या मृत्यूशी निगडित 3 विचित्र योगायोग; तुम्हीही पडाल विचारात... श्रादेवी आणि 'फ्रेंन्ड्स' फेम मॅथ्यू पेरी याचं देखील निधन झालं बाथटबमध्ये... दोघांच्या निधनाबाबत धक्कादायक गोष्टी समोर

श्रीदेवी आणि मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूशी निगडित 3 विचित्र योगायोग; जाणून व्हाल थक्क
| Updated on: Oct 31, 2023 | 10:25 AM

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 : दोन दिवसांपूर्वी हॉलिवूड स्टार मॅथ्यू पेरी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला… मॅथ्यू पेरी यांचं निधन बाथटबमध्ये झालं आहे. मॅथ्यू पेरी यांनी त्यांच्या अमेरिकेतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याने घरातील स्टाफला काही कारणासाठी बाहेर पाठवलं होतं. पण स्टाफ घरी आल्यानंतर त्याला अभिनेता मृत अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांना कळवलं… याच घटनेची तुलना दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत करण्यात येत आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या निधनाने खळबळ माजली आहे. श्रीदेवी यांचं निधन देखील बाथटबमध्ये झालं होतं. २०१८ मध्ये श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास दुबई याठिकाणी घेतला. निधनानंतर श्रीदेवी यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं होतं. नंतर तपासात हॉटेल रूमच्या बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आल. श्रीदेवी एका कौटुंबिक लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईला गेल्या होत्या.

 

 

आता दोघांच्या मृत्यूशी निगडित 3 विचित्र योगायोग समोर येत आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला, ‘धक्कादायक गोष्ट म्हणजे श्रीदेवी आणि मॅथ्यू पेरी यांचं निधन बाथटबमध्ये झालं आहे. योगायोग म्हणजे दोघांचं निधन वयाच्या ५४ व्या वर्षी झालं आहे.’

 

 

दरम्यान, बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याबद्दल मोठा खुलासा केला होता, पडद्यावर स्लिम दिसण्यासाठी श्रीदेवी उपाशी राहायच्या आणि ‘क्रॅश डाएट’ करायच्या. एवढंच नाही तर, शुटिंग दरम्यान देखील श्रीदेवी बेशुद्ध पडल्या होत्या. तर मॅथ्यू पेरी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते डिप्रेशनच्या विळख्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे.

दोघांचा जन्म झाला होता एकाच महिन्यात

सांगायचं झालं तर, श्रीदेवी आणि मॅथ्यू पेरी यांचा जन्म एका महिन्यात झाला झाला. मॅथ्यू पेरी यांचा जन्म १९ ऑगस्ट १९६९ तर श्रीदेवी यांचा जन्म १३ अगस्त १९६३ मध्ये झाला होता. श्रीदेवी यांच्या निधनानंतर देखील बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली होती. श्रीदेवी यांच्या निधनाला आज अनेक वर्ष उलटली आहेत. पण तरी देखील त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांमध्ये जिवंत आहेत.