Salman Khan च्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन, दु:खी अंतकरणाने दिला निरोप, video

Salman Khan Video: बॉलीवूड सुपर स्टार सलमान खान याच्या कुटुंबातील जवळच्या फ्रेंडचा मृ्त्यू झाल्याने सलमान खानला मोठा धक्का बसला आहे. या फ्रेंडला निरोप देताना सलमानला अत्यंत दु:खी दिसला...

Salman Khan च्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन, दु:खी अंतकरणाने दिला निरोप, video
actor salman khan video
| Updated on: Jun 09, 2026 | 9:45 PM

बॉलिवुड अभिनेता सलमान खान त्याच्या कुटुंबाप्रमाणे त्याच्या मित्रांची देखील काळजी घेत असतो. मित्रांच्या सुख आणि दु:खाच्या प्रसंगात तो त्यांना आधार देत उभा रहात असते. आता सलमान खान याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात सलमान खूपच दु:खी दिसत आहे. वास्तविक त्यांची कौटुंबिक मैत्रिणी कुमुद राणे हिचे निधन झाले आहे. त्यामुळे सलमान याला अतिव दु:ख झाले. सलमान त्याच्या मैत्रिणीला अंतिम निरोप देण्यासाठी पोहचला आणि त्यावेळी त्यांच्या भावनांना आवर घालताना त्याला खुप त्रास झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की सलमान कुमुदच्या निधनाने खचलेला दिसला. कुमुद राणे यांचे पती देखील सलमानचे जिवलग मित्र आहेत. त्यांचे नाव जग्गी राणे असे आहे. कुमुद एक हेअरस्टायलिस्ट होत्या. मुंबईच्या वांद्रे भागातच त्यांचे सलुन आहे. कुमुद या कॅन्सरशी लढत होत्या. त्याची संघर्ष अखेर संपला आहे. केवल सलमानच नाही तर अरबाझ खान, सोहेल खान, त्यांची आई सलमा आणि हेलन, सोहेलची मुले निर्वाण आणि अरबाझ खानचा मुलगा अरहान देखील कुमुदच्या अंत्यदर्शनाला आले होते.

येथे व्हिडीओ पाहा –

निर्वाणला आले रडू..

सोहेल खान याचा मुलगा निर्वाण याचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.त्यात पाठून अरहान त्याला सावरताना दिसत आहे. कुमुद राणे सलमानच्या संपूर्ण कुटुंबांची जवळची सदस्य होत.तिच्या निधनाने सलमान खान याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

साल २०२५ मध्ये कुमुद राणे आणि तिचे पतीन जग्गी राणे या दाम्पत्याने सलमान खान सोबत नव्या वर्षाचे सेलिब्रेशन केले होते. कुमुद हीने इंस्टाग्रामवर सलमान सोबत फोटो देखील शेअर केले होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओत जवळच्या व्यक्तीला गमावल्याचे दु:ख सलमानच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.

सलमान खानचे प्रोजेक्ट

सलमान खान सध्या एका एक्शन-ड्रामा फिल्म चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वामशी पेडिपल्ली करत आहेत. या चित्रपटात सलमान सोबत नयनतारा काम करत आहे. या चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे. पुढच्या वर्षी ईदच्या सणाला हा चित्रपट रिलीज होणार आहे. अजूनपर्यंत या चित्रपटाचे नाव जाहीर केलेले नाही. याच वर्षी सलमानचा मातृभूमी हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. आधी हा चित्रपट १७ एप्रिल रोजी रिलीज होणार होता. आता या याचे प्रदर्शन पुढे ढकलेले आहे. अजून नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

Follow Us