
Sonali Bendre Son: एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं होतं. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, टीव्ही विश्वात सक्रिय आहे. अनेक शोमध्ये अभिनेत्री परीक्षकाच्या भूमिकेत दिसते. पण आता सोनाली तिच्या कोणत्या सिनेमामुळे किंवा कोणत्या अन्य कारणामुळे नाही तर, मुलामुळे चर्चेत आली आहे. सोनाली बेंद्रेच्या मुलाला पाहून चाहते देखील अवाक् झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली बेंद्रे हिच्या मुलाची चर्चा रंगली आहे.
सोनाली बेंद्रे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटींसोबत सोनाली हिच्या नावाची चर्चा रंगली. पण अखेर सोनाली हिने गोल्डी बहल याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा आहे. सोनाली आणि गोल्डी यांच्या मुलाचं नाव रणवीर असं आहे. सध्या रणवीरचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. उंच-हँडसम रणवीरला पाहून चाहत्यांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत.
लहानपणी खूप गोंडस आणि गोलू मोलू दिसणारा रणवीर बहल आता खूप उंच आणि देखणा झाला आहे. दिसायला तो हुबेहुब त्याच्या आईसारखा आहे. त्याचे तीक्ष्ण नाक, मोठे डोळे आणि मोहक हसण्याचा वारसा त्याच्या आईकडून मिळाला आहे. उंचीच्या बाबतीतही तो कमी नाही. त्याची उंची वडील गोल्डी बहल यांच्यापेक्षा जास्त आहे.
रणवीर बहलचा जन्म 2005 साली झाला. रणवीरचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याला हिरो बनवायला सुरुवात केली आहे. सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीर खेळात खूप सक्रिय आहे. एकदा अभिनेत्री मुलाच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली होती. रणवीर याला दम्याचा त्रास आहे. रणवीरला लहान असताना दमा असल्याची माहिती तिला मिळाली… असं अभिनेत्रीने मुलाखतीत दिली.
पण सोनाली बेंद्रेने कधीही आजाराला मुलावर वर्चस्व गाजवू दिलं नाही. आपल्या मुलाला मजबूत बनवण्यासाठी, सोनाली बेंद्रेने मुलाला अगदी लहान वयातच पोहायला लावलं. त्याला कार्डिओही करून दिला. याशिवाय त्याला खेळातही सक्रिय ठेवण्यात आले. यामुळे मुलाला आठवड्यातून एकदाच इनहेलरची आवश्यकता असते. सोनाली कायम तिच्या मुलासोबत आणि नवऱ्यासोबत फोटो पोस्ट करत असते.