महिमा चौधरीने अबॉर्शन केलं तेव्हा, कशी होती अवस्था, नवऱ्यामुळे अभिनेत्रीने घेतलेला ‘तो’ मोठा निर्णय
Mahima Chaudhry Love Life: पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पुन्हा प्रेग्नेंट होती महिमा चौधरी, का घेतला अबॉर्शनचा निर्णय, , नवऱ्यामुळे अभिनेत्रीने घेतलेला मोठा निर्णय, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त महिमाच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Mahima Chaudhry Love Life: अभिनेत्री महिमा चौधरी हिने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. तेव्हा महिमाच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर चाहते फिदा होते. आज महिमा मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. महिमा चौधरी बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचली. पण खासगी आयुष्यात अभनेत्रीने अनेक चढ – उतारांचा सामना केला आहे. एका मुलाखतीत महिमा हिने लग्न, प्रेग्नेंसी, अबॉर्शन आणि मुलीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
महिमा चौधरी हिने 2006 मध्ये बॉबी मुखर्जी याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2013 मध्ये महिमा आणि बॉबी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बॉबी याच्यासोबत महिमा आनंदी नव्हती. अभिनेत्रीला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आई -वडिलांना काहीही सांगायचं नव्हतं. अखेर अभिनेत्रीने टोकाचा निर्णय घेतला आणि पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
बॉबी आणि महिमा यांना एक मुलगी देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर महिमा दुसऱ्यांदा प्रग्नेंट राहिली होती. पण अभिनेत्रीने अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. नवऱ्यावसोबत आनंदी नसल्यामुळे अभिनेत्रीने दुसऱ्या बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री कोणत्या इव्हेंटसाठी जायची तेव्हा मुलीला आईकडे सोडून जायची.
महीमा आणि बॉबी यांनी गुपचूप आणि लवकर लग्न उरकलं . त्यानंतर 2007 साली महिमाने गोंडस मुलीला जन्म दिला. काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. महिमा आणि बॉबी यांनी 2013 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बॉबी आणि महिमा यांचा घटस्फोट झाला नसला तरी दोघे एकत्र राहत नाही. तर महिमा 15 वर्षीय मुलीचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करते. सध्या सर्वत्र महिमा चौधरी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.
सांगायचं झालं तर, महिमा चौधरी हिचं नाव खेळाडू लिएंडर पेस याच्यासोबत देखील जोडण्यात आलं होतं. दोघांचं नातं लग्नपर्यंत देखील पोहोचलं होतं. पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. कायम पेस याने इतर महिलांसोबत असलेले रिलेशनशिप महिमा हिला कळले होते.