
Sonu Nigam: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायत सोनू निगम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टनंतर सोनू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यांच्या विरोधात FIR देखील दाखल करण्यात आला आहे. FIR दाखल झाल्यानंतर सोनूने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘पहलगाममध्ये जेव्हा पँट उतरवण्यात आली तेव्हा भाषा विचारली नव्हती?’ असं वक्तव्य गायकाने केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनू निगम याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. गायकाने एक व्हिडीओ पोस्ट करत प्रकरणावर स्वतःचं मत मांडलं आहे.
व्हिडीओ शेअर करत सोनू निगम म्हणाला, ‘फक्त चार – पाच गुंडांसारखे लोकं होते. जे जोरजोरात ओरडत होते. कॉन्सर्टला आलेले अन्य लोकं देखील त्यांना असं करु नका म्हणत होते. तेथे काही मुली होत्या, त्या देखील असं करु नका असं सांगत होत्या. वातावरण खराब करु नका असं त्यांना वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे त्या पाच लोकांना सांगणं गरजेचं होतं की, पहलगाममध्ये जेव्हा पँट उतरवण्यात आली तेव्हा भाषा विचारली नव्हती.
‘कन्नड लोकं फार चांगली आहे. पण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यात वाईट लोकं देखील असतात. त्यांना हे सांगणं महत्त्वाचं आहे की ते प्रेक्षकांना धमकावून तुम्हाला गाण्यास भाग पाडू शकत नाहीत. मी कन्नड गाण्यांचा एक तासाचा संच घेऊन आलो होतो, पण इतरांना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थांबवणं महत्त्वाचं आहे.’
पुढे सोनू निगम म्हणाला, ‘कन्नड लोकं हे सुंदर लोक आहेत, म्हणून त्यांची तुलना सामान्य लोकांशी करू नका. तिचे चार – पाच लोकं होती ज्यांनी मला धमकी दिली. ते मागणी करत नव्हते, ते मला धमकावत आहेत.’ सध्या सर्वत्र सोनू निगमची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगम गाणी गात होता. तेव्हा एक चाहत सतत गायकावर कन्नडमध्ये गाणं गाण्यासाठी दबाव टाकत होता. अशात सोनूने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली नाही कारण चाहते त्याला धमकी देत होता. यानंतर सोनू निगम याने जे वक्तव्य केलं. ज्यामुळे आता वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘हेच कारण आहे, ज्यामुळे पहलगाम याठिकाणी युद्ध झालं आहे..’ गायकाच्या अशा वक्तव्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे..