
क्रिकेट विश्व आणि बॉलिवूड विश्वाचं फार जवळचं नातं आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंना डेट केलं आहे. अनेकांचं नातं तर लग्नापर्यंत पोहोचलं. पण काहींचं मात्र ब्रेकअप झालं. एवढंच नाही तर, काही असे क्रिकेटपटू देखील आहेत ज्यांनी लग्नानंतर अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध ठेवले आणि प्रेमासाठी बायकोला सोडण्यासाठी देखील तयार झालेले. अशात क्रिकेटपटूपैकी एक म्हणजे सौरव गांगुली… सौरव गांगुली याने आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारताला अनेकदा विजय मिळवून दिला. अनेक रेकॉर्ड सौरव गांगुली याच्या नावावर आहे. सौरव गांगुली बीबीसीआयचा अध्यक्ष देखील होता.
एक काळ असा होता जेव्हा सौरव गांगुली फक्त उत्तर क्रिकेटमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला. अभिनेत्री नगमा हिच्यासोबत सौरव गांगुली याचे प्रेमसंबंध एकेकाळी चर्चेचा विषय होता. नगमा हिने साऊथ, बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
आज नगमा अभिनयापासून दूर सामाजिक कार्यात सक्रिय आहे. पण एक काळ असा देखील होता जेव्हा नगमा आणि सौरव गांगुली एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
एक काळ असा होता जेव्हा सौरव गांगुलीचं नाव क्रिकेट जगतात चर्चेत होतं. त्या काळात तो त्याच्या अफेअर्समुळेही चर्चेत होता. खूप कमी लोकांना माहिती आहे की सौरवचं हृदय एकेकाळी नगमासाठी धडधडत होतं आणि तो तिच्यासाठी काहीही करू शकत होता.
रिपोर्टनुसार, सौरव गांगुली आणि नगमा यांची पहिली भेट मुबंईत एका कॉन्फ्रेन्स दरम्यान झालं. दोघांच्या मैत्रीची सुरुवात तिथेच झाली. कालांतराने मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मिळालेल्या माहितीनुसार दोघांनी एकमेकांना जवळपास 2 वर्ष डेट केलं. दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता.
एका मुलाखतीत नगमा हिने सौरव गांगुलीच्या पत्नीबद्दल मोठा खुलासा देखील केलेला. सौरव गांगुली पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तयार झालेला. पण पत्नीने घटस्फोटासाठी स्पष्ट नकार दिलेला. या सर्व गोष्टींचा परिणाम सैरव याच्या करीयरवर होऊ लागला. अखेर सौरव याने नगमासोबत असलेलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
2001 मध्ये जेव्हा सौरव आणि नगमा यांचं ब्रेकअप झालं तेव्हा सौरव याने पत्नीसोबत वैवाहिक आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात केली. 1997 मध्ये सौरव याने डोना हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. सौरव आणि डोना यांच्या मुलीचं नाव सना गांगुली असं आहे. सौरव गांगुली आज पत्नी आणि मुलीसोबत रॉयल आयुष्य जगत आहे. शिवाय व्यवसाय देखील सांभाळत आहे.