Mahavatar Narsimha सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दहशत, 5 दिवसांत बंपर कमाई

Mahavatar Narsimha Box Office Collection Day 5: 'महावतार नरसिम्हा' सिनेमा मोडतोय सर्व रेकॉर्ड, बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त सिनेमाची दहशत, 5 दिवसांत केली बंपर कमाई

Mahavatar Narsimha सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दहशत, 5 दिवसांत बंपर कमाई
| Updated on: Jul 30, 2025 | 10:30 AM

Mahavatar Narsimha Box Office Collection Day 5: ‘सैयार’ सिनेमा प्रमाणेच ‘महावतार नरसिम्हा’ देखील बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. चित्रपटगृहांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली आहे. ज्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसत आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वाचा लेटेस्ट एनिमेटेड सिनेमा चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ‘सैय्यारा’नंतर सर्वत्र ‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

रिलीजच्या पाचव्या दिवशी, ‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाने पुन्हा एकदा त्याच्या अद्भुत कलेक्शनने सर्वांना चकित केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुट्टी नसताना देखील सिनेमा तुफान कमाई करताना दिसत आहे. आता येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी सिनेमा किती कोटींची कमाई करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाची दमदार कमाई

25 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या ‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सॅकॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘महावतार नरसिम्हा’ ने रिलीजच्या पाचव्या दिवशी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. ही कमाई पहिल्या दोन दिवसांच्या कमाईच्या तुलनेत फार मोठी आहे. सुट्टी नसताना देखील अनेक जण सिनेमा पाहण्यासाठी जात आहेत.

सिनेमाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढत असल्यामुळे सिनेमा आठवड्याच्या शेवटपर्यंत 50 कोटी रुपयांपर्यंत जाईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी 1.75 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने 4.6 कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी 9.5 कोटी, चौथ्या दिवशी 6 कोटी, पाचव्या दिवशी 5 कोटी… म्हणजे सिनेमाने आतापर्यंत 26.85 कोटी रुपयांचा कमाई केली आहे.

अशाप्रकारे, ‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली आहे. कमी बजेटमध्ये बनवलेला हा अॅनिमेटेड साऊथ सिनेमा येत्या काळात आणखी जास्त कमाई करताना दिसू शकतो… अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.