मुली 4 ठिकाणी तोंड मारून येतात आणि…, कथाकाराच्या वक्तव्यावर भडकल्या माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी
Disha Patani Sister Khushboo Patani: आजच्या काळात 25 वर्षांच्या मुली 4 ठिकाणी तोंड मारून येतात आणि..., कथाकार अनिरुद्धाचार्य महाराजांच्या वक्तव्यावर माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी यांचा संताप..., सध्या सर्वत्र वादग्रस्त वातावरण

Disha Patani Sister Khushboo Patani: अनेक बॉलिवूड स्टार चर्चेत असलेल्या घटनांवर उघडपणे स्वतःचं मत व्यक्त करतात. सध्या कथाकार अनिरुद्धाचार्य महाराजांच्या एका विधानावरून सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी यांनी महाराजांच्या वादग्रस्त विधानावर स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये खुशबू, अनिरुद्धाचार्य यांच्या विधानाबद्दल त्यांना ट्रोल करताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खुशबू यांनी महाराजांवर टीका केली आहे.
अनिरुद्धाचार्य यांचं वादग्रस्त वक्तव्य?
प्रसिद्ध कथाकार अनिरुद्धाचार्य यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलींबद्दल प्रश्न निर्माण केली आहे. अनिरुद्धाचार्य म्हणाले, ‘काही मुलं 25 वर्षांच्या मुलींची निवड करतात आणि त्यांनी घेवून येतात. पण त्या 25 वर्षांच्या मुली अधीच 4 ठिकाणी तोंड मारून आलेल्या असतात…’, या वादग्रस्त विधानावर खुशबू यांनी टीका केली आहे.
जो बाबा लड़कियों को सिर्फ शरीर समझे, वो संत नहीं, सीधा जेल के लायक है। अनिरुद्धाचार्य जैसे बाबा का बहिष्कार होना चाहिए। खुशबू पटानी ने सच दिखाया अब बोलो भक्तों, क्या यही है तुम्हारा धर्म? 😡🔥 pic.twitter.com/i2OuxiBhku
— Anand Yadav (Sonu) (@yadavsonuanand) July 29, 2025
खुशबू पटानी यांच्याकडून संताप व्यक्त
कथाकाराच्या बोलण्यावर नाराजी व्यक्त करताना, खुशबू यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘मी त्या भाषणात असती तर, त्यांना विचारलं असतं, तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे… अनिरुद्धाचार्य राष्ट्रविरोधी आहेत.’ एवढंच नाही तर, खुशबू यांनी लोकांना विनंती केली की समाज आणि महिलांचा अपमान करणाऱ्या अशा कथाकाराचं समर्थन करू नका.
पुढे खुशबू म्हणाल्या, ‘बाबाला जर लिव्हइन रिलेशनशिपची समस्या आहे, तर मुलांवर बाबा प्रश्न का नाही उपस्थित करत. जे लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये राहण्याची निवड करतात. त्यांनी फक्त मुलींवर प्रश्न का उपस्थित केला.’ सध्या खुशबू यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत.
