शाहरुख खान याने मॅनेजर पूजा ददलानी यांच्या ओढणीने पुसला चेहरा, अन् पत्नी… लालबागच्या राजाजवळील व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड स्टार शाहरुख खान लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला. यावेळी शाहरुख खान याच्यासोबत पत्नी गाैरी खान, मुलगी सुहाना खान आणि मॅनेजर पूजा ददलानीसोबत होते. यादरम्यानची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

शाहरुख खान याने मॅनेजर पूजा ददलानी यांच्या ओढणीने पुसला चेहरा, अन् पत्नी... लालबागच्या राजाजवळील व्हिडीओ व्हायरल
Shah rukh khan
| Updated on: Sep 22, 2026 | 5:02 PM

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान तूफान चर्चेत आहे. शाहरुख खान, त्याची पत्नी गाैरी खान आणि मुलगी सुहाना खान मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी देखील उपस्थित होती. आपल्या मोजक्या सुरक्षारक्षकांसोबत शाहरुख खान लालबाग राजाच्या दर्शनाला पोहोचला. यावेळी मनोभावे बाप्पाचा आर्शिवाद घेताना शाहरुख खान दिसला. मात्र, यावेळी एक अशी गोष्ट घडली, ज्याची सोशल मीडियावर तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. शाहरुख खान याची पत्नी आणि मुलीसोबत पूजा ददलानी हिनेही बाप्पाचे दर्शन घेतले. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर शाहरुख खानची लेक सुहाना हिच्या डोळ्यात काहीतरी गेले. यानंतर शाहरुख खान आणि गाैरी खान तिचे डोळे पुसताना दिसले.

यादरम्यान सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये शाहरुख खान हा आपला चेहरा पुसताना दिसत आहे. तो ओढणीने चेहरा पुसत आहे. गाैरी आणि सुहाना खान शेजारी उभ्या आहेत. त्यांच्या चर्चा सुरू होती. शाहरुख खान हा मॅनेजर पूजा ददलानी हिच्या ओढणीने आपला चेहरा पुसताना व्हिडीओ क्लिपमध्ये स्पष्ट दिसत आहे. हीच व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे.

शाहरुख खान याची मॅनेजर म्हणून गेल्या काही वर्षांपासून पूजा ददलानी काम करते. पूजा ददलानी मोठ्या संपत्तीची मालक आहे. अनेकदा पूजा ददलानी शाहरुख खान याच्यासोबत दिसते. त्यातच लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी ती शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबासोबत पोहोचली होती. शाहरुख खान याने गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

आपल्या चाहत्यांनाही हात दाखवताना शाहरुख खान दिसला. शाहरुख खान याच्यासोबतच अनेक कलाकार आणि खेळाडू लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले. भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा हा देखील आपली पत्नी रितिका सचदेह हिच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला होता. बॉलिवूडचे कलाकार दरवर्षी मोठ्या संख्येने लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. यंदाही शाहरुख खान याने लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us