AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निधनानंतर पाच वर्षांनी Sridevi यांची झलक पुन्हा चाहत्यांना येणार अनुभवता ; जाणून घ्या कसं..

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी त्यांच्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका आजही लोकप्रिय आहेत. आता या भूमिकेतून श्रीदेवी येणार चाहत्यांच्या भेटीला....

निधनानंतर पाच वर्षांनी Sridevi यांची झलक पुन्हा चाहत्यांना येणार अनुभवता ; जाणून घ्या कसं..
Sridevi
| Updated on: Feb 07, 2023 | 8:02 AM
Share

Sridevi : एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त श्रीदेवी यांच्या नावाची चर्चा होती. श्रीदेवी यांच्या निधनाला आता पाच वर्ष पूर्ण होणार आहेत. पण आजही त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनातून कमी होत नाहीत. कोणत्याही महत्त्वाच्या क्षणी कुटुंबाला आणि चाहत्यांना श्रीदेवी यांची आठवण येते. श्रीदेवी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांच्या निधनाला पाच वर्ष पूर्ण होणार आहेत. श्रीदेवी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्ताने त्या पुन्हा चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. श्रीदेवी भारतात नाही तर, चीनमध्ये मोठ्या पडद्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे

श्रीदेवी यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात घर केलं. श्रीदेवी स्टारर ‘इंग्लिश विंग्लिश’ (English Vinglish) सिनेमा २०१२ साली प्रदर्शित झाला होता. आता तब्बल १५ वर्षांनंतर सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. २४ फेब्रुवारी २०२३ मध्ये श्रीदेवी स्टारर ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमा चायनामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठ्या पडद्यावर श्रीदेवी यांना पाहाता येणार आहे. महत्त्वाच म्हणजे ६ हजार सिनेमागृहांमध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ प्रदर्शित होणार आहे.

इरॉस इंटरनॅशनलचे सीओओ कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतीय सिनेमांनी हळूहळू स्पर्धात्मक चीनी सिनेविश्वात प्रवेश केला आहे, जो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आम्ही चीनमध्ये भारतीय सिनेमांची वाढती मागणी पाहिली आहे, विशेषत: जे सिनेमे सांस्कृतिकदृष्ट्या प्रेरित आहेत. दिवंगत बॉलीवूड सुपरस्टार श्रीदेवी यांच्या भूमिकांपैकी खास भूमिका चिनी प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.. असं देखील कुमार यांनी संगितलं आहे.

गौरी शिंदे यांच्या आई भोवती फिरतेय सिनेमाची कथा दिग्देर्शिका गौरी शिंदे यांनी आईच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभवातून प्रेरित होऊन ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमा साकारण्याचा निर्णय घेतला. सिनेमात श्रीदेवी यांच्या गृहिणीच्या भूमिकेने सर्वांच्या मनात घर केलं. पती आणि मुलीकडून सतत होणाऱ्या अपमानानंतर परदेशात जावून स्वतःला शोधणाऱ्या गृहिणीचा प्रवास सिनेमात दाखवण्यात आला.

सिनेमात श्रीदेवी यांच्यासोबत आदिल हुसैन, सुमित व्यास, प्रिया आनंद हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसले होते. आता पुन्हा श्रीदेवी यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या सर्वत्र श्रीदेवी स्टारर ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमाची चर्चा आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी त्यांच्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका आजही लोकप्रिय आहेत. प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटविणारी त्यांची एक भूमिका म्हणजे ‘इंग्लिश विंग्लिश’मधील (English Vinglish) शशी गोडबोले.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.