Ricky Kej: 2 महिन्यांपासून कस्टम विभागात अडकून पडला ग्रॅमी पुरस्कार; अखेर ट्विट करताच मिळाली तातडीची मदत

| Updated on: Jun 07, 2022 | 3:49 PM

64व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ या विभागात ‘डिवाइन टाइड्स’साठी स्टीवर्ट कोपलँडसह हा पुरस्कार मिळाला. मात्र त्यांचा हा पुरस्कार बेंगळुरूच्या सीमाशुल्क विभागाकडे (Bengaluru customs dept) अडकून पडला आहे.

Ricky Kej: 2 महिन्यांपासून कस्टम विभागात अडकून पडला ग्रॅमी पुरस्कार; अखेर ट्विट करताच मिळाली तातडीची मदत
music composer Ricky Kej
Image Credit source: ANI
Follow us on

संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार सोहळा (Grammy Awards) यावर्षी एप्रिल महिन्यात पार पडला. लास वेगासमध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात भारताचे संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांनी पुरस्कार पटकावला. 64व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ या विभागात ‘डिवाइन टाइड्स’साठी स्टीवर्ट कोपलँडसह हा पुरस्कार मिळाला. मात्र त्यांचा हा पुरस्कार बेंगळुरूच्या सीमाशुल्क विभागाकडे (Bengaluru customs dept) अडकून पडला आहे. जवळपास दोन महिने झाले तरी त्यांना अद्याप हा पुरस्कार मिळालेला नाही. अखेर सीमाशुक्ल विभागाने यात त्यांची मदत करणार असल्याचं सांगितलं आहे. मंगळवारी ट्विट करत रिकी यांनी याबद्दलची माहिती दिली.

‘खुशखबर: भारताच्या सीमाशुल्क विभागाने जलद हस्तक्षेप केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या मेडलला सीमाशुल्क विभागाकडून परवानगी मिळाली असून उद्या (बुधवारी) ते मला दिलं जाईल. नुकताच मला Fedex कडून कॉल आला. कस्टम अधिकाऱ्यांनी मदत केली नसती तर हे शक्य झालं नसतं,’ असं ट्विट रिकी यांनी केलंय. केज यांनी सोशल मीडियाद्वारे बेंगळुरू सीमाशुल्क विभागाला या समस्येबद्दलची माहिती दिली आणि त्यांना हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याची विनंती केली होती.

हे सुद्धा वाचा

रिकी यांचे ट्विट्स-

‘मी नुकताच ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. माझं मेडल बेंगळुरूच्या कस्टम विभागात गेल्या दोन महिन्यांपासून अडकून पडलं आहे. फेडेक्सकडून मला कुठलीही मदत मिळत नाहीये. माझं मेडल मला परत मिळवण्यासाठी तुम्ही काही मदत करू शकाल का’, असं ट्विट केज यांनी कस्टम विभागाला टॅग करत केलं होतं. ‘यासाठी कस्टम विभागाला कोणीही दोष देऊ नका अशी मी विनंती करतो. त्यांना प्रॉडक्टबद्दल माहिती नसेल. ते फक्त त्यांच्या प्रक्रियेचं पालन करत आहेत. माझं ट्विट करण्यामागचं कारण हेच आहे की त्यांना त्या पॅकेजबद्दल कळावं आणि त्यांनी ते माझ्यापर्यंत पोहोचवावं’, असंही त्यांनी म्हटलं होतं.

रिकी यांच्या या ट्विटवर कस्टम विभागाने लगेच रिप्लाय दिला आणि त्यानुसार त्यांनी ग्रॅमी मेडल परत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. रिकी यांनी यावर्षी दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे.