प्रचंड राग येतो… बॉलिवूड कलाकारांमुळे संतापला सुबोध भावे, नेमकं काय घडलं?

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने एका पॉडकास्टमध्ये मराठी कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे संताप व्यक्त केला आहे.

प्रचंड राग येतो... बॉलिवूड कलाकारांमुळे संतापला सुबोध भावे, नेमकं काय घडलं?
subodh-bhave
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 12:30 PM

मराठी अभिनेता सुबोध भावे हे कायमच त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतही ठसा उमटवला आहे. ते आपल्या मोकळ्या आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. अलिकडेच त्यांनी बॉलिवूड आणि मराठी उद्योगातील कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपले मत मांडले. यावेळी त्यांनी एक खंत आणि संतापही व्यक्त केला. “प्रत्येकाला आपला सन्मान असतो. तो सन्मान देणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

अलीकडेच सुबोध भावे यांनी मेहक अंकर यांच्या पॉडकास्टमध्ये मनातील अनेक गोष्टी सर्वांसमोर मांडल्या. या मुलाखतीत त्यांनी अनेक अनुभव आणि किस्से सांगितले आहे. विशेषतः हिंदी आणि मराठी कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीतील फरकावर त्यांनी रोखठोक भाष्य केले. ते म्हणाले, “जेव्हा एखादा कलाकार महाराष्ट्रातील किंवा इतर कार्यक्रमात येतो आणि त्याच्यासोबत एक मराठी अभिनेताही असतो, ज्याने आपले आयुष्यातील चाळीस वर्षे या सिनेइंडस्ट्रीसाठी वाहिलेली आहेत, जो कमालीचा अभिनेता आहे…”

Loading...

काय म्हणाले सुबोध भावे?

“पण दुसऱ्या कलाकाराने फक्त हिंदी सिनेमांमध्ये काम केले म्हणून त्याला डोक्यावर घेतले जाते. त्याचवेळी मराठी कलाकार मागे गर्दीत स्वतःला शोधत असतो. तो जबरदस्त अभिनेता आहे, ज्येष्ठ कलाकार आहे. पण त्याने हिंदी सिनेमांमध्ये काम केले नाही म्हणून… अशी स्थिती पाहिली की प्रचंड राग येतो. प्रत्येकाचा आपला सन्मान असतो. तो आदर द्यायला हवा, सन्मान करायला हवा. जिथे योग्य सन्मान दिला जात नाही, तिथे मग खूप राग येतो,” असे सुबोध भावे यांनी स्पष्टपणे सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us