
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी चर्चेत असते. ती काही दिवसांपूर्वी कफ्तान ड्रेसमध्ये दिसली होती. मलायकानं या ड्रेसला हुप इयररिंगसह अॅक्सेसराइझ केले आहे. या ड्रेसमध्ये मलायका सुंदर दिसत होती.

बिपाशा बसू नुकतंच एका प्रिंटेड कफ्तान ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये बिपाशा खूपच हॉट दिसत होती. या ड्रेससोबत तिनं काळ्या रंगाचा चष्मा कॅरी केला होता.

शिल्पा शेट्टी अनेकदा कफ्तान ड्रेसमध्ये दिसते. तिचा जबरदस्त आकर्षक लुक चाहत्यांना प्रभावित करतो. या लाल ड्रेसमध्ये ती सुंदर दिसतेय. हा लूक तिनं सिल्व्हर हील्सनं पूर्ण केला आहे.

गरोदरपणात करीना कपूर खान कफ्तान ड्रेसमध्ये दिसली. यादरम्यान, करीना एकापेक्षा एक स्टाईलिश आणि आरामदायक कफ्तान आउटफिटमध्ये दिसत होती.

सोहा अली खाननं नुकतंच प्रिंटेड केशरी कफ्तान कॅरी केला होता. यासोबत तिनं व्हाईट पँट कॅरी केले होते. तिचा आरामदायक लूक उन्हाळ्यासाठी योग्य आहे.