Suniel Shetty: “.. तर माझं करिअरच उद्ध्वस्त झालं असतं”; सुनील शेट्टी असं का म्हणाला?

सुनील शेट्टीने सांगितलं बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशामागचं कारण; म्हणाला "कचऱ्यासाठी लोक पैसे.."

Suniel Shetty: .. तर माझं करिअरच उद्ध्वस्त झालं असतं; सुनील शेट्टी असं का म्हणाला?
Suniel Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 12, 2023 | 10:28 AM

मुंबई: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीदरम्यान अभिनेता सुनील शेट्टीने ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडपासून सुटका करण्याची विनंती त्यांच्याकडे केली होती. यानंतर सुनील शेट्टी सोशल मीडियावर चर्चेत आला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूड चित्रपटांच्या अपयश होण्यामागचं कारण सांगितलं. आजच्या घडीला प्रेक्षक चित्रपटांच्या नावावर मिळणाऱ्या कचऱ्यासाठी पैसे भरायला तयार नसतात, असं रोखठोक विधान त्याने या मुलाखतीत केलं.

प्रेक्षक आता कचऱ्यासाठी पैसे भरायला तयार नसतात आणि त्यामुळेच बॉलिवूडवर अशी वेळ आली आहे, असं सुनील शेट्टी म्हणाला. “माझी मुलं मला विचारतात की तुम्ही चित्रपटांमध्ये काम करणं बंद का केलं? त्यावर मी त्यांना सांगितलं की मी बऱ्याच चुका केल्या आहेत आणि आता प्रेक्षक त्या कचऱ्यासाठी पैसे भरायला तयार नाहीत, जे मी त्यांना देत आलो होतो”, असं त्याने सांगितलं.

इतकंच नव्हे तर बॉलिवूडने पुन्हा शून्यापासून सुरूवात करून अर्थव्यवस्था कशी चालते, हे समजून घ्यावं असंही ते म्हणाले. “90 च्या दशकात कलाकारांविषयी इतकी मतं बनवली जायची नाही, जितकी आज बनवली जातात. माझा पहिला आरझू हा चित्रपट फ्लॉप ठरला. पण मी ॲक्शनमध्ये चांगला असल्याने मला पुढचे चित्रपट मिळाले. लोक माझ्याबद्दल चांगलं बोलत होते. जर का ही गोष्ट आजच्या काळात घडली असती तर माझं करिअरच उद्ध्वस्त झालं असतं. सोशल मीडियावर माझी प्रचंड टीका झाली असती”, असा फरकही त्याने सांगितला.

सुनील शेट्टीने नुकतीच ‘धारावी बँक’ या चित्रपटात भूमिका साकारली. यामध्ये त्याच्यासोबत विवेक ऑबेरॉयने मुख्य भूमिका साकारली. सुनीलच्या ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.