Govinda : ज्यादिवशी रंगेहाथ पकडेन..; मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर पत्नी सुनिताची रोखठोक प्रतिक्रिया

Govinda's Rumoured Affair : एका मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचं अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चांवर त्याची पत्नी सुनिता अहुजाने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये तिने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Govinda : ज्यादिवशी रंगेहाथ पकडेन..; मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर पत्नी सुनिताची रोखठोक प्रतिक्रिया
Sunita Ahuja and Govinda
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2025 | 3:39 PM

Govinda’s Rumoured Affair : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदाचं खासगी आयुष्य खूप चर्चेत आहे. पत्नी सुनिता अहुजाने घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल केल्याचं म्हटलं गेलं होतं. परंतु गणेशोत्सवादरम्यान एकत्र येत दोघांनी विभक्त होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. आता नुकत्याच एका व्लॉगमध्ये सुनिता घटस्फोटाच्या चर्चांवर मोकळेपणे व्यक्त झाली. या व्लॉगमध्ये सुनितासोबत अभिनेत्री संभावना सेठसुद्धा होती. संभावनाच्या एका प्रश्नावर सुनिताने कबूल केलं की तिनेदेखील गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधाच्या अफवा ऐकल्या होत्या. इतकंच नव्हे तर असं काही घडलं तर सर्वांत आधी मीडियाला त्याबद्दलची माहिती देईन, असंही तिने सांगितलं.

या व्लॉगमध्ये सुनिता म्हणाली, “मूळ समस्या अशी आहे की त्याच्या कुटुंबात असे लोक आहेत, ज्यांना मी आणि गोविंदा एकत्र नको आहोत. ती लोकं विचार करतात की हे दोघं आणि त्यांचं कुटुंब इतकं खुश कसं राहतंय? कारण त्यांचं त्यांच्या पत्नी-मुलांसोबत पटत नाहीये. गोविंदा चांगल्या लोकांसोबत उठबस करत नाही. माझं असं मत आहे की तुम्ही जर घाणेरड्या लोकांसोबत राहणार, तर तुम्हीसुद्धा तसेच बनणार. आज माझा फ्रेंड सर्कल नाहीये, माझी मुलंच माझ्यासाठी मित्रमैत्रिणी आहेत.”

“मी आणि चीची गेल्या 15 वर्षांपासून समोरासमोर राहतोय. परंतु आमचं येणं-जाणं असतंच. जो चांगल्या महिलेला दु:ख देईल, तो कधीच सुखी राहणार नाही, सतत बेचैन राहील. मी लहानपणापासून ते आतापर्यंत माझं संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी दिलंय. आजसुद्धा मी त्याच्यावर खूप प्रेम करते. शंभर टक्के माझी थोडीफार नाराजी आहे, कारण मीसुद्धा ऐकतेच आहे. परंतु मी खूप स्ट्राँग आहे, कारण माझ्याकडे माझी मुलं आहेत”, अशा शब्दांत सुनिता व्यक्त झाली.

गोविंदा एका मराठी अभिनेत्रीला डेट करतोय, अशीही चर्चा होती. त्यावर सुनिता पुढे म्हणाली, “आजकाल मुली संघर्ष करण्यासाठी येतात. त्यांना शुगर डॅडीची सवय झाली आहे. एखादी मुलगी विचार करते की मला पॉकेट मनी मिळून जाईल, माझं घरदार चालेल. जोपर्यंत मी पकडणार नाही.. परंतु जेव्हा मी पकडेन मग तेव्हा सनी देओलचा ‘ढाई किलो का हाथ’चा डायलॉग आहे ना, तसा माझा 5 किलोचा आहे. ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. तुमचं इतकं वय झालंय, मुलं मोठी झाली आहेत आणि तुम्ही हे काय करताय? मुलंसुद्धा विचारतात. परंतु माणसाला खोटं बोलायची सवय झाली आहे. तो खोटं बोलतच जाणार.”