AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉडेलने वकिलाला अडकवलं जाळ्यात… त्यानंतर अश्लील फोटो, लैंगिक छळ अन्… प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं तेव्हा…

मॉडेलसोबत झालेली पहिला ओळख वकिलाला पडली महागात... तिने आधी वकिलाला आपल्या जाळ्यात अडकवलं... त्यानंतर दोघांचे एकत्र अश्लील फोटो काढले... पुढे लैंगिक छळ अन्... धक्कादायक प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर...

मॉडेलने वकिलाला अडकवलं जाळ्यात... त्यानंतर अश्लील फोटो, लैंगिक छळ अन्... प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं तेव्हा...
Extortion Case
| Updated on: Dec 14, 2025 | 11:44 AM
Share

झगमगत्या विश्वातून अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येत असतात. आता देखील असंच एक प्रकरण समोर येत आहे. एका 28 वर्षीय मॉडेलने वकिलाला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्याकडून खंडणी मागण्यास सुरुवात केली. मॉडेलकडून होणारा त्रास टोकाला गेल्यानंतर वकिलाने पोलिसांत धाव घेतली. आता याप्रकरणी पोलिसांनी मॉडेलला अटक केली आहे. धक्कादायक सत्य म्हणजे, मध्ये मॉडेलसोबत तिचे आई – बहीण आणि अन्य एका व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मुंबई येथील गोरेगाव पोलिसांनी मॉडेल अटक केली असून, इतरांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण 2024 मधील आहे. जेव्हा वकीलाची भेट हिमाचल प्रदेशातील जोधन येथील रहिवासी आणि मॉडेल पारुल राणा हिच्यासोबत झाली. त्यानंतर दोन महिन्यांनंतर दोघे बाली येथे गेले… तेव्हा राणा हिने वकिलाकडून 20 लाख रुपयांची मागणी केली. पण जेव्हा वकिलाने आर्थिक अडचणीचं कारण देत नकार दिला तेव्हा दोघांच्या नात्यात वाद सुरु झाले…

पोलिसांनी सांगितल्यानुसार, वकिलाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर राणाने एकत्र काढलेले अश्लील फोटो ऑनलाईन अपलोड करण्याची धमकी दिली. एवढंच नाही तर, त्याच्याविरुद्ध खोटा लैंगिक छळाचा खटला दाखल करण्याची देखील धमकी दिली.

सामाजिक कलंक आणि व्यावसायिक नुकसानाच्या भीतीने, वकिलाने जुलै 2024 ते जुलै 2025 दरम्यान हप्त्यांमध्ये पैसे मॉडेलला दिले. एवढंच नाही तर, त्यानंतर मॉडेलने खंडणीच्या रकमेत मोठी वाढ केली. राणाचे वडील हरविंदर सिंग आणि आई मीना राणा, तिची बहीण निधी राणा आणि एक साथीदार कोनिका वर्मा यांचा यात सहभाग असल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहिनीनुसार, पैसे देण्यास मागे-पुढे झाल्यानंतर राणा हिच्या कुटुंबियांकडून सतत फोन येण्यास सुरुवात व्हायची… धक्कादायक गोष्ट म्हणजे, मॉडेलने वकिलाकडून तब्बल 30 लाख रुपये उकळले… सततचा छळ आणि मानसिक दबाव सहन न झाल्याने, वकिलाने अखेर गोरेगाव पोलिसांकडे धाव घेतली, त्यानंतर पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.