पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिलेल्या शुभेच्छांवर संजय राऊतांची टीका
सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. लोकभवन येथे राज्यपालांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा देत, त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करावेत आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करावे असे ट्वीट केले. यावर संजय राऊतांनी मोदींच्या शुभेच्छांवर घराणेशाहीवरून टीका केली.
सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील लोकभवनातल्या दरबार हॉलमध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या ऐतिहासिक क्षणी, सुनेत्रा पवार यांनी संविधानावर निष्ठा राखण्याची आणि निस्वार्थ भावनेने राज्याची सेवा करण्याची प्रतिज्ञा केली.
शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना ट्वीट करून शुभेच्छा दिल्या. “महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की, त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील,” असे मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. पंतप्रधान मोदींच्या या शुभेच्छांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
राऊत यांनी मोदींना उद्देशून म्हटले की, “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या, धन्यवाद मोदीजी. घराणेशाहीच्या आरोपातून आणि चिखलफेकीतून आपण स्वतःला मुक्त केलेत हे बरे झाले.” त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Feb 01, 2026 09:57 AM
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
