AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार विमान अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट, विमान कंपनीचे काळे कारनामे उघड

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात एक धक्कादायक वळण आले आहे. ज्या VSR व्हेंचर्स कंपनीचे विमान ते वापरत होते, ती कंपनी आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्लॅकलिस्टेड असल्याची माहिती समोर आली असून युरोपियन सुरक्षा यंत्रणेने (EASA) गंभीर खुलासे केले आहेत.

अजित पवार विमान अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट, विमान कंपनीचे काळे कारनामे उघड
ajit pawar 1
| Updated on: Feb 01, 2026 | 9:40 AM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आता या प्रकरणाने एक धक्कादायक वळण घेतले आहे. ज्या VSR व्हेंचर्स कंपनीचे विमान अजित पवार वापरत होते, ती कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच ब्लॅकलिस्ट म्हणजे काळ्या यादीत असल्याची माहिती समोर येत आहे. युरोपियन युनियनच्या सुरक्षा यंत्रणेने (EASA) या कंपनीच्या सुरक्षिततेवर गंभीर ताशेरे ओढले होते. तरीही ही कंपनी सेवा कशी पुरवत होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

काय आहे ‘लेव्हल १’ नोटीसचे प्रकरण?

विमान वाहतुकीतील आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने (EASA) VSR व्हेंचर्स या कंपनीला लेव्हल १ ची नोटीस दिली होती. याचा अर्थ असा की, कंपनीच्या विमानांमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी गंभीर तांत्रिक त्रुटी होती. सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत झालेल्या एका अपघातानंतर कंपनीने आवश्यक कागदपत्रे आणि सुरक्षा रेकॉर्ड देण्यास नकार दिला होता. ज्यामुळे त्यांचे परवाने वर्षभरापूर्वीच निलंबित करण्यात आले होते.

आता याप्रकरणी युरोपियन युनियनच्या सुरक्षा यंत्रणेने तपासातील ३ सर्वात मोठे खुलासे केले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदी असूनही ही कंपनी उड्डाणे कशी करत होती? हे यंत्रणेचे मोठे अपयश मानले जात आहे. मूळ पायलट वाहतूक कोंडीत अडकल्याने १५ हजार तासांचा अनुभव असलेल्या कॅप्टन सुमित कपूर यांना ऐनवेळी बोलावण्यात आले होते. त्यांना उड्डाणाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता का? असा संशय व्यक्त होत आहे. तसेच पहिल्या प्रयत्नात लँडिंग न होणे आणि दुसऱ्या प्रयत्नात संतुलन बिघडणे, यामागे इंजिन निकामी होणे किंवा अनस्टेबल फायनल अप्रोच कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला आहे. केंद्राच्या AAIB विभागाने ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे. यातील माहितीवरून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. कंपनीच्या मालकांवर कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

अजित पवार यांचे विमान २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:१० वाजता मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले. सकाळी ८:४६ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत असताना विमानाचे संतुलन बिघडले आणि ते धावपट्टीपासून काही अंतरावर एका शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, सह-वैमानिक शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी अशा ५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड