AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ महिन्यांची चिमुकली, मध्यरात्री अंथरुणातून गायब, नेमकं काय घडलं?

नाशिकमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मध्यरात्री आई-वडिलांसोबत झोपलेली मुलगी अचानक गायब झाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

आठ महिन्यांची चिमुकली, मध्यरात्री अंथरुणातून गायब, नेमकं काय घडलं?
Nashik RoadImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 11:53 AM
Share

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आठ महिन्यांची चिमुकली मध्यरात्री घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी येथे १७ तारखेच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनाक्रमाने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. चिमुकली मध्यरात्री कुठे गेली? याचा तपास पोलीस करत आहेत.

मध्यरात्री सुमारे १२ वाजता चिमुकली आपल्या आई-वडिलांच्या अंथरुणातून गायब झाली आहे. घरात सर्वजण झोपलेले असताना चिमुरडी अचानक गायब झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला. सकाळ होताच ही बाब समोर आली आणि शोध मोहीम सुरू झाली. या प्रकरणी चिमुकलीच्या वडिलांनी नांदगाव पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस यंत्रणा तसेच परिसरातील नागरिकांनी मिळून चिमुकलीचा शोध सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून शोध मोहिम करत आहेत. परिसरातील घरे, शेतजमिनी, जंगलाचे भाग आणि आसपासच्या ठिकाणी शोध सुरू असून अद्याप कोणतीही ठोस माग काढता आलेली नाही. मात्र, आई-वडिलांचा एका व्यक्तीवर संशय होता. या वक्तीने सर्व आरोपांमुळे स्वत:चे आयुष्य संपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतरही या प्रकरणी अद्याप सत्य समोर आलेले नाही.

केवळ आठ महिन्यांची एवढी छोटी चिमुकली बेपत्ता झाल्याने विविध प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. इतक्या छोट्या बाळाला कोण आणि कसे घेऊन जाईल, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. काहींना यामागे अपहरणाची शक्यता वाटत असताना, काही जण अपघाती गायब होण्याचीही शक्यता व्यक्त करत आहेत. मात्र पोलिसांनी सर्वच अंगांनी चौकशी सुरू ठेवल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास तातडीने कळवावी. सध्या शोध मोहीम जोरात सुरू असून चिमुकली लवकरात लवकर सापडावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही.

Follow Us
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर