Mukesh Ambani: मुकेश अंबानी हे पण शेतकरी? किती एकर शेतीचे मालक, आता शेतात कोणते पीक?
Mukesh Ambani Farmland : जगातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची ओळख इतकीच मर्यादीत नाही. रिलायन्स, जीओसह त्यांनी शेतीतही मोठी भरारी घेतली आहे. हे अनेकांच्या गावी सुद्धा नाही. अनेकांना ही गोष्ट माहिती नाही. किती एकर जमिनीचे ते आहेत मालक?

आशियातील आणि जगातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी हे शेतीतही रमतात हे सांगितलं तर अनेकांना धक्का बसेल. त्यांचे शेती प्रेम केवळ खासगी फार्महाऊस पूरतं मर्यादीत नाही. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या माध्यमातून अंबानी कुटुंबियांची जामनगमध्ये आमराई बहरली आहे. त्याला धीरूभाई अंबानी लखीबाद आमराई या नावाने ओळखले जाते. ही आंब्याची बाग जवळपास 600 एकरमध्ये पसरली आहे. या आमराईमध्ये जवळपास 200 हून अधिक प्रकारचे 1,50,000 पेक्षा जास्त आंब्याची झाडं लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे इथं रसायनमुक्त शेतीचा प्रयोग आणि पर्यावरण पूरक, नैसर्गिक शेतीवर भर देण्यात येत आहे. या शेतीसाठी पाण्याचे स्त्रोतही बळकट करण्यात आले आहे. या बागेची संपूर्ण गुजरातमध्ये चर्चा आहे.
पडीक आणि क्षारयुक्त जमिनीवर बहरली बाग
गुजरातमधील जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीचे रिफायनरी कॉम्लेक्स आहे. त्याला लागूनच 1997 मध्ये पर्यावरण जतनासाठी पडीक आणि क्षारयुक्त जमीन विकसीत करण्यात आली. तिथे विविध प्रकारची झाडं कलम करण्यात आली. देशातील विविध वृक्षांनी इथं मूळ धरलं. तर त्यानंतर या पडीक जमिनीवर आमराई बहरली. रिलायन्स इथं वृक्ष लागवड करून हरीत पट्टा तयार केला. जगातील सर्वात आधुनिक आणि समृद्ध अशा आमरायांमध्ये ही सर्वात अग्रेसर आमराई मानली जाते.
प्रदूषण नियंत्रणासाठी हरित पट्टा
जामनगर य़ेथील रिफायनरी प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. या परिसरात कोणतेही प्रदूषण होऊ नये यासाठी 1997-98 मध्ये इथे वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचवेळी या परिसरात आमराईची कल्पना पुढे आली आणि त्यादृष्टीने लागवड सुरू झाली. हरित पट्टा तयार करताना आमराई बहरली. या देशभरातून बहुउपयोगी विविध जातीची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. पडीक आणि क्षारयुक्त जमीन काहीच वर्षात सुपीक ठरली. त्यानंतर आमराई बहरली.
आमराईत 150000 लाखाहून अधिक आंब्याची झाडं
या परिसरात सुरुवातीला जवळपास 100000 आंब्याची झाडं होती. त्यानंतर ही झाडं वाढवण्यात आली. देशभरातूनच नाही तर जगाभऱातील इतर आंब्याच्या जाती कलम करण्यात आल्या. त्यांना इथले पोषक वातावरण मानवले. ही झाडं तरारली. या भागात आंब्याच्या 200 हून अधिक प्रजाती आहेत. या आमराईत केसर, हापूस, लंगडा, चौरा, आम्रपाली आणि रत्नासह इतर अनेक प्रसिद्ध आंबे आहेत.
