AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील फायरिंचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर

निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. इमारतीबाहेर पाच राऊंड फायरिंग झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत.

Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील फायरिंचा CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; आरोपीबद्दल धक्कादायक माहिती समोर
Rohit ShettyImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 01, 2026 | 9:47 AM
Share

निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार करणारा आरोपी चालत येऊन इमारतीवर गोळीबार करून निघून गेल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी चालत येऊन इमारतीसमोर उभा राहून फायरिंग करताना दिसला. आरोपीसोबत अन्य कोणी होतं का याचाही तपास पोलीस करत आहेत. आतापर्यंत केलेल्या प्राथमिक तपासात एकच आरोपी चालत येऊन इमारतीसमोर फायरिंग करून निघून जाताना दिसत आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी बाइकवरून एकटाच जुहू परिसरात आला. रोहित शेट्टीच्या घरापासून काही अंतरावर त्याने बाइक लावली आणि त्यानंतर तो चालत रोहित शेट्टीच्या घरासमोर आला. घरासमोर उभा राहून त्याने चार ते पाच राऊंड फायरिंग केली आणि पुन्हा बाईकवरून निघून गेला. या गोळीबार प्रकरणाची आणि सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची मोडस ऑपरेंडी सारखीच असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बिश्नोई गँगचा यामध्ये सहभाग असल्याचा मुंबई पोलिसांना संशय बळावला आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी पहाटे मुंबईतील जुहू परिसरातील रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर इमारतीबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ही घटना घडली तेव्हा रोहित शेट्टी त्याच्या घरी होता की नाही, हे अद्याप कळू शकलेलं नाही. विभागीय पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक याप्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने इमारतीवर पाच राऊंड फायरिंग केली. आरोपींची ओळख पटविण्यासाठी आणि घटनेचा क्रम निश्चित करण्यासाठी पोलीस इमारतीभोवतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते, त्यात धक्कादायक माहिती समोर आली. सध्या रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर कडक पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली असून फॉरेन्सिक टीमदेखील पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचल आहे.

याआधी अभिनेता सलमान खानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर अशाच पद्धतीने अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्या प्रकरणात बिश्नोई गँगचे गुंड सामील होते. त्यामुळे आता रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील गोळीबारप्रकरणीही बिश्नोई गँगचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होईल, असं म्हटलं जात आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका