AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govida : गोविंदापासून फक्त हीच वाचू शकली..; मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल हे काय बोलून गेली सुनिता?

Sunita Ahuja Govinda Divorce: अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा अत्यंत मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. मनात काहीच न ठेवता ती बेधडकपणे वक्तव्ये करताना दिसते. नुकत्याच एका शोमध्ये तिने एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल टिप्पणी केली.

Govida : गोविंदापासून फक्त हीच वाचू शकली..; मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल हे काय बोलून गेली सुनिता?
Sunita Ahuja and Sonali BendreImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2025 | 9:19 AM
Share

Sunita Ahuja Govinda Divorce: अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या संसारात फूट पडल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहेत. सुनिताने गोविंदाला घटस्फोट देण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केल्याचंही म्हटलं गेलं होतं. परंतु गणेशोत्सवादरम्यान जेव्हा या दोघांना पुन्हा एकत्र पाहिलं गेलं, तेव्हा विभक्त होण्याच्या चर्चांना काही काळासाठी का होईना, पूर्णविराम मिळाला आहे. यादरम्यान सुनिताने नुकतीच ‘पती पत्नी और पंगा 2’ या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्र परीक्षकाच्या भूमिकेत आहे. तिला पाहताच गोविंदाच्या पत्नीने अशी टिप्पणी केली, जे ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

सुनिता ‘पती पत्नी और पंगा 2’ या शोमध्ये पाहुणी म्हणून पोहोचली होती. यावेळी सूत्रसंचालक मुनव्वर फारुकीने सुनिताला स्टेजवर डान्स करण्यासाठी बोलावलं. तेव्हा सुनिता मुनव्वरला म्हणाली, “मी तुझी बीवी नंबर 1 नाहीये, जे तू माझ्यासोबत डान्स करतोय.” सुनिता तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. यामुळे अनेकदा ती सोशल मीडियावर चर्चेत येते. शोमध्ये पुढे ती म्हणते, “या शोमध्ये येऊन मी माझ्या जुन्या आठवणींमध्ये रमून गेली. ज्या आठवणी आनंदाने भरलेल्या आहेत. मला गोविंदाच्या गाण्यावर नाचायला खूप आवडतं. सोनालीसोबत आणि या इतर जोडप्यांसोबत स्टेज शेअर करून मला खूप छान वाटलं.”

शोमध्ये सोनालीसोबत वेळ घालवणं ही गोष्ट अत्यंत खास असल्याचीही भावना सुनिताने व्यक्त केली. “आम्ही दोघांनी बऱ्याच गप्पा मारल्या आणि जुन्या गोष्टींवरून खूप हसलो. गोविंदाने तसं तर सर्वच सौंदर्यवर्तींसोबत फ्लर्ट केलंय. फक्त सोनालीच त्याच्यापासून वाचली. ही अशी एकमेव अभिनेत्री आहे, जिच्यासोबत गोविंदाने फ्लर्ट केलं नाही”, असं सुनिता म्हणताच सर्वजण हसू लागतात. सुनिता आणि गोविंदा यांनी 1987 मध्ये लग्न केलं. तर 1994 मध्ये गोविंदा आणि सोनाली यांनी ‘आग’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या दोघांचा ‘जिस देश में गंगा रहता है’ हा चित्रपटसुद्धा चांगलाच गाजला होता.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुनिताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून अहुजा हे आडनाव काढून टाकलं होतं. डिसेंबर 2024 मध्ये सुनिताने वांद्रे कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता, असं वृत्त ‘हॉटरफ्लाय’ या वेबसाइटने दिलं होतं. यावेळी तिने गोविंदावर व्यभिचार, क्रूरता असे गंभीर आरोप केले होते.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.