Govinda: गोविंदाच्या घटस्फोटाबाबत मॅनेजरचा मोठा खुलासा; सुनिताच्या आरोपांवर स्पष्टच म्हणाले..
सुनिता अहुजाने पती गोविंदाविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. या चर्चांवर अखेर गोविंदाच्या मॅनेजरने मौन सोडलं आहे. या दोघांच्या घटस्फोटाबाबत मॅनेजर शशी सिन्हाने मोठा खुलासा केला आहे. सुनिताच्या आरोपांवरही स्पष्टीकरण दिलं आहे.

अभिनेता गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्या संसारात पुन्हा खटके उडाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. लग्नाच्या 38 वर्षांनंतर सुनिताने गोविंदाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. इतकंच नव्हे तर तिने मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्जसुद्धा दाखल केल्याचं म्हटलं गेलंय. या अर्जात सुनिताने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या सर्व चर्चांवर आता गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने प्रतिक्रिया दिली आहे. शशीने गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा तथ्यहीन आणि अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. त्या दोघांचा घटस्फोट होणार नाही, असं त्याने म्हटलंय.
काय म्हणाला गोविंदाचा मॅनेजर?
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाचा मॅनेजर म्हणाला, “प्रत्येक जोडप्यामध्ये थोडेफार वाद आणि मतभेद असतातच. या सर्व जुन्या गोष्टी आहेत. आता पुन्हा एकदा त्यात मीठ-मसाला टाकून काही लोक आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करत आहेत.” मिळालेल्या माहितीनुसार सुनिताने गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, अत्याचार आणि तिला एकटं सोडण्याचा आरोप केला आहे. सुनिताच्या या आरोपांवर शशी म्हणाला, “गोविंदासारखी व्यक्ती कोणावर हात उचलू शकत नाही, ओरडू शकत नाही. मग हे अत्याचाराचे आरोप कुठून आले? मी त्यांच्यासोबत खूप जवळून काम केलंय. ते अजिबातच असे नाहीत, जशी त्यांची प्रतिमा आता निर्माण केली जात आहे. हे सर्व मुद्दे जुने आहेत, ज्यावर दोघं मिळून सोबत तोडगा काढत आहेत.”
View this post on Instagram
याविषयी शशी पुढे म्हणाले, “गोविंदा कोर्टात दाखल झाले नाहीत आणि सुनितासुद्धा कोर्टात गेल्या नाहीत. कोणत्या जोडप्यात समस्या नसतात? गोविंदावर सुनिता खूप प्रेम करतात आणि दोघं एकत्र आहेत. दोघांचा घटस्फोट होणार नाही. ते दोघं नकारात्मकतेऐवदी मुलांचं करिअर आणि लग्नावर लक्ष केंद्रीत करत आहेत.”
“छोट्याशा गोष्टीला इतकं मोठं करून तुम्ही फक्त एकाचं नातं खराब करत आहेत. व्ह्यूजच्या नादात तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणार का? तुम्ही इतक्या वर्षांत कधी गोविंदा यांना सुनिता यांच्याबद्दल काही बरंवाईट बोलताना ऐकलंय का? भले सुनिता यांनी काही मुलाखतींमध्ये गोविंदा यांच्यासोबत काही गोष्टी बोलल्या असतील. पण आता गणेश चतुर्थीला तुम्हाला दोघं एकमेकांसोबत दिसतील, तुम्ही घरी या”, असंही त्यांनी म्हटलंय.
गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्या घटस्फोटाची सर्वांत आधी चर्चा फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू झाली होती. हे दोघं कित्येक दिवसांपासून वेगवेगळे राहत असल्याचंही म्हटलं गेलंय. यादरम्यान गोविंदाच्या अफेअरच्याही चर्चांना उधाण आलंय
