
मुंबई : अभिनेता सनी देओल सध्या आगामी ‘गदर २’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर ‘गदर २’ सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सिनेमासाठी कलाकार आणि दिग्दर्शक अनिल शर्मा उत्सुक आहेत. सनी अनेक ठिकाणी जावून सिनेमाचं प्रमोशन करत आहे. वर्षाच्या सुरुवातीला अभिनेता सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस १६’ शोमध्ये पोहोचला होता.. शोमध्ये सनी आणि अभिनेता सलमान खान यांच्यातील मैत्री चाहत्यांनी अनुभवली…पण गेल्या अनेक वर्षांपासून सलमान आणि सनी यांच्यामध्ये दुश्मनी असल्याचं सांगण्यात आलं. शिवाय दोघांमध्ये ३६ चा आकडा होता..
सनी देओलचे फक्त सलमान खानसोबतच नाही तर आमिर खानसोबतही वाद असल्याचं अनेकदा समोर आलं. त्यामुळेच दोघेही इंडस्ट्रीतील जुने कलाकार असूनही ते कधीच एकत्र दिसले नाहीत. सनी देओल, सलमान खान, आमिर खान यांच्याबद्दल अनेकांना माहिती आहे. पण सनी आणि अभिनेता अनिल कपूर यांच्याबद्दल फार कमी चाहत्यांना माहिती आहे..
सनी देओल आणि अनिल कपूर यांच्यातही ३६ चा आकडा आहे. अनिल आणि सनी यांनी फक्त ३ सिनेमांमध्ये एकत्र काम केले. धक्कादायक म्हणजे तिन्ही सिनेमांमध्ये दोघांमध्ये भांडण झाल्याच्या चर्चा तुफान रंगल्या. सनी देओल आणि अनिल कपूर यांच्यात असलेले वाद इतक्या टोकाला पोहोचले की, दोघांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही.
सनी देओल आणि अनिल कपूर यांना आज इंडस्ट्रीमध्ये ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असेल.. पण तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केल्यानंतर दोघांनी एकमेकांचा चेहरा देखील पाहिला नाही.. दोघांनी इंतकाम, राम अवतार आणि जोशीले या तीन सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमाच्या शुटिंगदरम्यान दोघांमधील वाद वाढले.. अनिल आपल्यावर वर्चस्व गाजवत असल्याचा आरोप सनीने केला होता.
सनी देओलने सांगितले की, अनिल कपूर डायलॉग्स बोलतांना त्याचे स्वतःचे विचार पुढे मांडायचा जेणे करून डायलॉग्सवर त्याचं वर्चस्व राहिल… राम अवतारा सिनेमाच्या वेळी अनिल अशा पद्धतीने डायलॉग बोलत होता की त्याच्या तोंडातून थुंकी बाहेर यायची.. एक काळ असा होता जेव्हा सनी आणि अनिल यांच्यातील वाद प्रचंड गाजले..
तर दुसरीकडे अनिल कपूर यांनी देखील सनी देओलवर गंभीर आरोप केले होते.. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, सनीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. याशिवाय ‘जोशिले’ सिनेमाच्या पोस्टरवर पहिलं नाव अनिल कपूर याचं लिहिण्यात आलं होतं, तर दुसरं नाव सनी देओल याचं लिहिण्यात आलं… यामुळे देखील दोघांमध्ये वाद झाले… सनीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो अनिलसोबत कधीही काम करणार नाही आणि जरी केलं तरी स्क्रिप्ट आणि डायलॉग स्वतः पाहून काम करेल… असं दखील सनी म्हणाला होता..