AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Epstein Files : दिग्गजांचे काळे कारनामे… शरीरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी ‘या’ भारतीय तेलाचा वापर… रहस्य अखेर उघड

Epstein Files : जेफ्री एपस्टाईनच्या फाईलमध्ये अथा 5 हजार वर्ष जुन्या भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख असल्याचं देखील समोर आलं आहे. दिग्गजांच्या खासगी आयुष्याची पोलखोल करणाऱ्या फाईलचं रहस्य आता भारतातील एका तेलापर्यंत पोहोचलं आहे... रहस्य नक्की काय आहे घ्या जाणून

Epstein Files : दिग्गजांचे काळे कारनामे... शरीरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी 'या' भारतीय तेलाचा वापर... रहस्य अखेर उघड
Epstein Files
| Updated on: Dec 21, 2025 | 9:04 AM
Share

Epstein Files: शुक्रवारी, अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टाईनशी संबंधित हजारो फाईल्स जारी केल्या आहे. ज्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या विधेयकानुसार 30 दिवसांच्या आत जाहीर करणं आवश्यक होतं. या फाईल्समध्ये एपिस्टन द्वारे वापरली मालीश पद्धती आणि आयुर्वेदाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये असं देखील म्हटलं आहे की, पाश्चिमात्य देशांमधील अनेक चिकित्सक आता भारतातील या 5 हजार वर्ष जुन्या नैसर्गिक उपचार पद्धतीवर आधारित मालिश आणि इतर उपचार देत आहेत. फाईलमध्ये ‘द आर्ट ऑफ गिविंग मसाज’ या नावाने एक आर्टिकल देखील आहे. ज्यामध्ये डिटॉक्सिफिकेशनसाठी तिळाच्या तेलाचा वापर केल्याचा देखील उल्लेख आहे.

एपिस्टनबद्दल सांगायचं झालं तर, 2019 मध्ये एपिस्टन याने मॅनहट्टन तुरुंगात आत्महत्या केली. त्याच्यावर असंख्य अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण आणि तस्करी यांसारखे गंभीर आरोप होते. एपिस्टन याचे जगातील दिग्गज व्यक्तींसोबत संबंध होते..

तिळाच्या तेलाचं काय आहे रहस्य

एपिस्टन फाईलमध्ये अनेक कागदपत्र आणि फोटो देखील आहेत… समोर आलेल्या माहितीनुसारत, फाईलमध्ये असलेल्या एका कागदपत्रात शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मालिश आणि आयुर्वेदाचा वापर केल्याचा उल्लेख आहे. याचा संबंध थेट भारतीय आयुर्वेदाशी असल्याची माहिती देखील समोर येत आहे…

फाईलमध्ये सांगितल्यानुसार, ‘पाश्चिमात्य देशांमधील अनेक चिकित्सक भारतातील 5 हजार जुन्या प्रणालीवर आधारित मालीश आणि उपचार देत आहेत…’ फाईलमध्ये ‘द आर्ट ऑफ गिविंग मसाज’ या नावाने एक आर्टिकल देखील असल्याचं सत्य समोर आलं आहे… ज्यामध्ये शरीरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी तेलाचा उपयोग केला जातो… असं देखील सांगण्यात आलं आहे.

एपस्टाईन फाईल समोर आल्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. फाईलमध्ये ट्रम्प यांचं फार कमी फोटो आहेत. पण समोर आलेले कागदपत्र आणि फोटो पूर्ण नसल्याचं देखील न्याय मंत्रालयाने मान्य केलं आहे. सांगायचं झालं तर, एपस्टाईनच्या फाईल्स राजकीयदृष्ट्याही संवेदनशील आहेत.

डेमोक्रॅट्सनी बऱ्याच काळापासून या फाईल्स जारी करण्याची मागणी केली होती… अशी देखील माहिती समोर येत आहे, अनेक वर्षांपासून ट्रम्प आणि एपस्टाईन मित्र होते. पण नंतर त्यांच्या संबंध बिघडले… फाईनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे देखील काही आक्षेपार्ह फोटो आहेत. तर माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मायकेल जॅक्सन यांचे एपस्टाईनसोबतचे फोटो देखील समोर आले आहेत. ट्रम्प किंवा क्लिंटन दोघांवरही एपस्टाईनशी संबंधित कोणत्याही गैरकृत्याचा आरोप नाही.

Follow Us
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...