
Sunny Deol JAAT: अभिनेता सनी देओल गेल्या काही दिवसांपासून ‘जाट’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सिनेमाच्या कमाईवरुन देखील अनेक चर्चा रंगताना दिसत आहे. 8 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा फ्लॉप होण्याच्या मार्गावर असताना, सिनेमाच्या टीमच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. अभिनेता सनी देओल, रणदीप हुड्डा, सिनेमाचे दिग्दर्शक गोपीचंद मलिनेनी आणि निर्माते नवीन यरनेनी यांच्याविरुद्ध जालंधरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिनेमातील एका सीनमुळे प्रकरण तापलं…
सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमात धार्मिक चिन्हाचा अपमान करणारे काही सीन टाकले आहेत… ज्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केली. त्यामुळे याप्रकणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सिनेमातील ज्या सीनमुळे वादग्रस्त वातावरण तयार झालं आहे, त्यात खलनायक रणदीप हुड्डा चर्चच्या पवित्र स्टेजमध्ये उभा असल्याचे दिसून येत आहे. या वेळी चर्चमध्ये गुंडगिरी आणि धमक्यांचे सीन दिसत आहेत. याशिवाय सिनेमातील अनेक गोष्टी आक्षेपार्ह असल्याचंही म्हटलं जात आहे.
सनी देओल स्टारर ‘जाट’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘गदर 2’ सिनेमानंतर सनीने ‘जाट’ सिनेमातून पदार्पण केलं आहे. 10 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जाट’ सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाने आतापर्यंत 60 कोटींचं कलेक्शन केलं आहे.