मोठा मुलगा 23 वर्षांचा असताना धर्मेंद्र यांनी केले हेमामालिनींशी लग्न, संतप्त सनी देओलने कधीच…

| Updated on: May 16, 2023 | 4:10 PM

Sunny Deol with Mother Prakash Kaur : हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्न केले. त्यावेळी सनी देओल 23 वर्षांचा होता. तो नेहमी आई प्रकाश कौर यांच्या पाठिशी उभा राहिला आणि सुरुवातीच्या काळात त्यांना हेमा यांच्याशी बोलणं देखील आवडत नव्हतं.

मोठा मुलगा 23 वर्षांचा असताना धर्मेंद्र यांनी केले हेमामालिनींशी लग्न, संतप्त सनी देओलने कधीच...
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध देओल कुटुंबात सध्या लग्नाच्या आनंदात आहेत. अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) जूनमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. करण त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्न करणार आहे आणि आजकाल दोघेही अनेकदा लंच डेटवर एकत्र दिसतात. दुसरीकडे, अशी बातमी समोर येत आहे की या लग्नामुळे हेमा मालिनी यांचे कुटुंबही देओल कुटुंबातील इतर सदस्यांच्या जवळ येणार आहे आणि लग्नासाठी उपस्थित राहणार आहे. सनी देओलने  हेमा मालिनी (Hema Malini) यांना त्याची आई म्हणून बराच काळ स्वीकारले नव्हते. सनी नेहमीच त्याची आई प्रकाश कौर (Prakash Kaur) यांच्या पाठीशी उभा राहिला आणि अलीकडेच मदर्स डेच्या निमित्ताने त्याने आपल्या आईसोबतचा एक सुंदर फोटोही शेअर केला.

सनी देओल हा नेहमीच देओल कुटुंबातील समजूतदार मुलगा मानला जातो. फिल्मी दुनियेत असताना त्याने नेहमीच आपली कौटुंबिक मुळे जपली. यासोबतच वडिलांची जबाबदारीही त्याने आपल्या खांद्यावर घेतली. सनीचा जन्म 19 ऑक्टोबर 1957 रोजी झाला. सनी व्यतिरिक्त धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना अजिता, विजेता आणि बॉबी अशी आणखी तीन मुलं आहेत. सनी नेहमीच आपल्या भावंडांच्या आणि आईच्या जवळ असायचा. 1980 मध्ये जेव्हा धर्मेंद्र यांनी ड्रीम गर्ल हेमा मालिनीसोबत लग्न केले तेव्हा सनी देओल 23 वर्षांचा होता.

हेमा मालिनी यांच्याशी लग्न तर केलं

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी एकत्र काम करताना प्रेमात पडले. पण अडचण अशी होती की धर्मेंद्र यांचे आधीच लग्न झाले होते. 1954 मध्ये त्यांचे लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले. पण हेमा आणि धर्मेंद्र एकमेकांच्या इतके प्रेमात होते की त्यांनी आपल्या नात्याला नाव देण्याचे ठरवले. 1980 मध्ये दोघांनीही कोणाचीही पर्वा न करता लग्न केले आणि प्रकाश कौर यांच्यासाठी तो सर्वात दुःखद दिवस होता. धर्मेंद्र हे प्रकाश कौर यांच्या खूप जवळचे होते आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून पळून जायचे नव्हते, म्हणून त्यांनी प्रकाश कौर यांना कधीही घटस्फोट दिला नाही आणि पती म्हणून नेहमीच आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. हेमा मालिनी यांनीही कधी विरोध केला नाही कारण तिने प्रेमाला महत्त्व दिले आणि धर्मेंद्र यांच्या समस्याही समजून घेतल्या.

सनी देओल मात्र धर्मेंद्र यांच्या लग्नामुळे खूपच रागावले होते. त्याने हेमामालिनीला कधीच आई मानले नाही. तो नेहमीच त्याची आई प्रकाश कौर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला.