Rhea Chakraborty | ‘तू तर वेश्या होतीस..’; रिया चक्रवर्तीसाठी सुशांतच्या बहिणीची संतप्त पोस्ट

2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया सर्वाधिक चर्चेत आली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास होत असताना त्यात रिया आणि तिचा भाऊ शौविकचं नाव समोर आलं होतं. या दोघांना अटकही झाली होती.

Rhea Chakraborty | तू तर वेश्या होतीस..; रिया चक्रवर्तीसाठी सुशांतच्या बहिणीची संतप्त पोस्ट
Sushant and Rhea
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 11, 2023 | 2:25 PM

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती तब्बल तीन वर्षांनंतर इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. एमटीव्हीवरील लोकप्रिय शो ‘रोडीज 19’मध्ये ती गँग लीडर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रियाच्या या कमबॅकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काहींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी पुन्हा एकदा तिच्यावर निशाणा साधला आहे. यादरम्यान आता सुशांतची बहीण प्रियांका सिंहची प्रतिक्रिया समोर आली आहे.

रोडीजचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रिया म्हणते, “तुम्हाला काय वाटलं, मी परत येणार नाही? मी घाबरून जाईन? घाबरण्याची वेळ आता दुसऱ्यांची आहे. भेटुयात ऑडिशन्सला.” रिया पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे, हे या व्हिडीओतून पहायला मिळतंय. या व्हिडीओवर सुशांतच्या बहिणीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रियांकाने नाव न घेता ट्विट केलंय, ‘तू का घाबरशील? तू तर वेश्या होती, आहे आणि राहशील. प्रश्न हा आहे की तुझा उपभोगता कोण आहे? कोणी सत्ताधारीच ही हिंमत करू शकतो.’ प्रियांकाने याआधीही रिया चक्रवर्तीवर निशाणा साधला होता.

2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया सर्वाधिक चर्चेत आली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास होत असताना त्यात रिया आणि तिचा भाऊ शौविकचं नाव समोर आलं होतं. या दोघांना अटकही झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर रिया बरेच दिवस माध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर होती. काही दिवसांपूर्वी रिया तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आली होती. ती बंटी सजदेहला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.

कोण आहे बंटी सजदेह?

बंटी हा रिॲलिटी स्टार आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा ही सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. स्पोर्ट्स आणि एंटरटेन्मेंट क्षेत्रातील एका मोठ्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा तो मालक आहे. काही वर्षांपूर्वी रियासुद्धा त्याच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची एक क्लाएंट होती, अशी माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपासून बंटी आणि रिया एकमेकांना डेट करत असल्याचं कळतंय.