Sushma Jaywant : सासऱ्यांनी लिव्ह-इनला पाठिंबा दिला…घटस्फोटानंतर होती लग्नाची भीती, ‘कमळी’ फेम अभिनेत्रीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
Kamali Fame Actress : 'कमळी' फेम सुषमा जयवंत नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

मराठी अभिनेत्री सुषमा जयवंत सध्या झी मराठी वाहिनीवरील 'कमळी' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारतेय. अभिनेत्री सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत सुषमानं तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्रीनं आधी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला.
सुषमा जयवंत म्हणाली की, 'आम्ही दोघेही घटस्फोटित आहोत. त्यामुळे आम्हाला कोणताही तामझाम नको होता. आम्ही 38 वर्षांचे होतो, त्यामुळे आमचं खूप वय झालेलं.'
'म्हणून, पुन्हा त्याच गोष्टी करायची आमची इच्छाच नव्हती. आमचं लिव्ह-इनमध्ये राहायचं ठरलं. माझ्या सासऱ्यांनी लिव्ह-इनला पाठिंबा दिला होता. त्यामुळे, आम्ही खूप साध्या पद्धतीनं लग्न केलं.'
दुसरं लग्न करण्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'खूप भीती वाटलेली. सगळं काही संपलं असं वाटलेलं. त्यामुळे दुसरं लग्न करण्याआधी मी कुणालला म्हणाले, जर पुन्हा असं काही झालं, तर मी कोलमडेन.'
'पण, कुणाल म्हणाला मी तुला सांभाळून घेईन. बाबानंतर कोणी आपल्यावर इतकं प्रेम करणारं भेटलं, तर तुम्ही लग्नाचा विचार करायला काही हरकत नाही.' असं सुषमानं पुढे सांगितलं. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सुषमा जयवंत बोलत होती.