Swapnil Joshi | एलिझाबेथ कोण या प्रश्नाचं उत्तर देणारा, स्वप्निलच्या ‘बळी’चा थरारक टीझर पहिला का?  

Swapnil Joshi | एलिझाबेथ कोण या प्रश्नाचं उत्तर देणारा, स्वप्निलच्या ‘बळी’चा थरारक टीझर पहिला का?  
स्वप्निल जोशी

अभिनेता स्वप्निल जोशीच्या (Sawpnil Joshi) ‘बळी’ चित्रपटाचा टीझर (Bali teaser) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Harshada Bhirvandekar

|

Mar 19, 2021 | 2:45 PM

मुंबई : अभिनेता स्वप्निल जोशीच्या (Sawpnil Joshi) ‘बळी’ चित्रपटाचा टीझर (Bali teaser) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ऊसासे टाकणाऱ्या आवाजातील एका आईचे आर्त उद्गार कानी पडतात. ‘बाSSळा’ अशी आर्त हाक ती कुणालातरी घालते आहे. त्यानंतर या चित्रपटाचा नायक एका पडक्या वाडारुपी रुग्णालयात कुणाचातरी शोध घेताना दिसतो. ‘मी इथेच आहे बाळा,’ असा त्या आईचा काहीसा घाबराघुबरा आवाज ऐकू येतो. त्या पाठोपाठ ‘एलिझाबेथSS’ अशी हाक ऐकू येते. ती आई ‘घाबरू नकोस…’ म्हणत आपल्या बाळाला धीर देवू पाहते….(Swapnil Joshi starrer upcoming Marathi Movie Bali teaser launch)

काही सेकंदांचा हा टीझर अत्यंत घबराट निर्माण करतो. अंगावर शहारा आणतो. ही एलिझाबेथ कोण, त्यातील आईचे आणि तिचे काही नाते आहे का? चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी कुणाचा शोध घेत आहे, असे असंख्य प्रश्न आपल्याला हा टीझर पाहिल्यावर पडल्याशिवाय राहत नाहीत. दरम्यान ‘समांतर आणि लपछपीच्या निर्मात्यांची प्रस्तुती’ असे शब्द पडद्यावर उमटतात. आपल्याला दर्जेदार निर्मितीची हमी मिळते. आपण काहीतरी अभूतपूर्व असे पाहत आहोत, अशी खात्री हा टीझर पाहून होते आणि ‘बळी’बद्दलची उत्कंठा ताणली जाते.

पाहा ‘हा’ थरारक टीझर!

(Swapnil Joshi starrer upcoming Marathi Movie Bali teaser launch)

मराठीतील हॉररपट!

हा चित्रपट प्रेक्षकांसाठी काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर घेवून येतोय, याची खुणगाठ बांधण्यासाठी हे पोस्टर पुरेसे ठरते. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-१’ आणि ‘समांतर-2’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आले होते. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे (Swapnil Joshi starrer upcoming Marathi Movie Bali teaser launch).

हा केवळ उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार नाही!

स्वप्निल जोशी या चित्रपटाबद्दल सांगताना म्हणतो, “जर तुम्ही थोडेसा मागे जाऊन विचार केलात, तर तुमच्या लक्षात येईल की, मराठी चित्रपट क्षेत्राने ‘लपाछपी’च्या आधी कधीही हॉरर चित्रपटाचा प्रयोग केलेला नाही. हॉरर विनोदी चित्रपटांचे प्रयोग झाले, पण तुमची झोप उडवेल असा मराठी चित्रपट झाला नाही. मला वाटते ‘बळी’ ती पोकळी नक्कीच भरून काढेल. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे चित्रपटाची कथा तुम्हाला घाबरवून टाकते. नेहमी ज्याप्रमाणे भारतीय हॉरर चित्रपटांमध्ये होते तसे भडक संगीत आणि उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार येथे नाही.”

(Swapnil Joshi starrer upcoming Marathi Movie Bali teaser launch)

हेही वाचा :

Video | आपल्या गोड आवाजाने अरुणिताने लावलंय प्रेक्षकांना वेड, ‘या’ कारणामुळे सध्या आलीय चर्चेत! पाहा व्हिडीओ…

Box Office Clash | जॉन अब्राहमची आणखी एका अभिनेत्याशी ‘टक्कर’, बॉक्स ऑफिसवर कोणाची जादू दिसणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें