
चित्रपटांपेक्षा आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. स्वराने नुकतेच तिच्या कोर्ट मॅरेजचे काही पोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

स्वरा भास्करने स्पेशल मॅरेज ॲक्टला चीअर्स करत ट्विट केलं, 'कमीत कमी हे अस्तित्त्वात आहे आणि प्रेम करण्याची संधी देतोय... प्रेमाचा अधिकार, आपला जीवनसाधी निवडण्याचा अधिकार, लग्न करण्याचा अधिकार, या एजन्सीचा अधिकार हा विशेषाधिक नसावा.'

स्वरा भास्करने राजकारणी फहाद अहमदशी कोर्टात स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत लग्न केलं. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. फहाद मुस्लीम तर स्वरा हिंदू आहे. एका रॅलीदरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती.

लग्नानंतर स्वरा आणि फहाद एकमेकांसोबत खूप खुश दिसले. दोघांनी कोर्टरुममधून बाहेर पडल्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात डान्स केला.

कोर्ट मॅरेजनंतर पुढच्या महिन्यात हे दोघं विधीवत लग्न करणार आहेत. स्वराने 6 जानेवारी रोजी समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद याच्याशी कोर्ट मॅरेज केलं आहे. या लग्नाचा खुलासा तिने जवळपास 40 दिवसांनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत केला.