Swara Bhasker: घरात घुसून मारू… स्वरा भास्करला थेट धमकी, नेमकं प्रकरण तरी काय?

Swara Bhaskar Controversy: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने एका ऐतिहासिक सिनेमातील दृश्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर करणी सेना आक्रमक झाली आहे. त्यांनी थेट स्वरा भास्कराल घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे.

Swara Bhasker: घरात घुसून मारू... स्वरा भास्करला थेट धमकी, नेमकं प्रकरण तरी काय?
Swara Bhaskar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 7:32 AM

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच चर्चेत असते. स्वरा तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखली जाते. स्वराचे २०१८ साली ‘पद्मावत’ चित्रपटाबाबत केलेले जुने विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्वराने चित्रपटातील जौहरच्या दृश्याबाबत वक्तव्य करत प्रश्न उपस्थित केला की, “अशा प्रकारच्या दृश्याचा लैंगिक हिंसाचार सहन केलेल्या महिलांवर काय परिणाम होऊ शकतो?” तिचे हे विधान समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि अनेक जणांनी अभिनेत्रीच्या विचारांचा विरोध केला. आता याच वादादरम्यान करणी सेनेकडून स्वरा भास्करला धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

संघटनेशी संबंधित लोकांनी अभिनेत्रीच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि तिला खूपच शिवीगाळ केली आहे. इतकेच नव्हे तर संघटनेशी संबंधित लोकांनी धमकी देताना म्हटले आहे की, स्वरा जेथे दिसेल तिथे तिच्या चेहऱ्याला काळे फासणार. तसेच ‘घरात घुसून मारू’ अशी धमकीही दिली आहे. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे?

स्वरा भास्करच्या विधानावरून करणी सेना भडकली

स्वरा भास्करने पद्मावत चित्रपट आणि जौहरबाबत केलेल्या विधानाबाबत वाद खूप वाढला आहे. करणी सेना महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा कीर्ती राठोड यांनी स्वराला भाषा सुधारण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, “स्वरा भास्करने आधी आपली भाषा सुधारावी. सनातन आणि आमच्या वीरांगनांच्या बलिदान व शौर्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा किंवा आपत्तिजनक टिप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही. राजपुतानाचा इतिहास आमच्या वीरांगनांच्या त्याग आणि धैर्याची साक्ष देतो. जौहर समजून घेण्यासाठी त्या काळाचा इतिहास आणि परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.”

कीर्ती राठोड पुढे म्हणाल्या, “जर कोणत्याही प्रथेवर प्रश्न उपस्थित करायचा असेल तर इतिहास आणि तथ्यांच्या आधारावर उपस्थित करा. पण आमच्या वीरांगनांच्या बलिदानाला अपमानजनक शब्दांत संबोधित करणे स्वीकारले जाणार नाही. करणी सेना अशा विधानांचा विरोध करते.”

घरात घुसून मारण्याची धमकी मिळाली

करणी सेनेचे मुंबई अध्यक्ष सुरजीत सिंह राठोड यांनी तर स्वराला मारण्याची धमकी दिली. त्यांनी म्हटले की, “स्वरा भास्करने राजस्थानच्या क्षेत्रनींच्या सुना-मुलींचा अपमान केला आहे. करणी सेना सार्वजनिक माफीची मागणी करते. महिला करणी सेना पदाधिकाऱ्यांना सांगेन की जेथे स्वरा भास्कर दिसेल तिथे तिचे तोंड काळे करा. आम्ही घरात घुसून मारू.” सध्या तरी याबाबत स्वराकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us