Swara Bhasker: बलात्कारानंतरही महिलांना…, भारताच्या परंपरेवर बोट ठेवत स्वराचं रोखठोक वक्तव्य, एका पोस्टने सर्वांची बोलतीच केली बंद

Swara Bhasker : 'पद्मावत' सिनेमातील जौहरच्या सीनवर अभिनेत्री स्वरा भास्कर हिचं रोखठोक वक्तव्य, भारताच्या परंपरेवर बोट ठेवत असं काय म्हणाली अभिनेत्री? स्वराच्या एका पोस्टने सर्वांचीच बोलती बंद केली..

Swara Bhasker: बलात्कारानंतरही महिलांना..., भारताच्या परंपरेवर बोट ठेवत स्वराचं रोखठोक वक्तव्य, एका पोस्टने सर्वांची बोलतीच केली बंद
Swara Bhasker
| Updated on: Sep 02, 2026 | 9:10 AM

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात स्वरा हिने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पाद्मावत’ सिनेमावर निशाणा साधला. सिनेमातील जौहरवर आधारित सीन स्वराला खटकला आहे. जौहरमध्ये स्वतःचा अंत करणाऱ्या महिलांची तुलना स्वरा हिने बलात्कार पीडितांसोबत केली आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला. स्वरा भास्कर हिच्या वक्तव्यामुळे इंटरनेटवरील वातावरण तापलं आहे.

जौहरवर आधारित सीनवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर स्वरा हिला टिकेचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी स्वरा भास्कर हिला शिवीगाळ देखील केली आहे. ज्यामध्ये महिला देखील सामिल आहेत. सांगायचं झालं तर, लोकांमध्ये संतापाची लाट इतकी उसळली की, स्वतः अभिनेत्रीला पुढे यावं लागलं. स्वरा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. स्वरा म्हणते, ‘ही खरंच हैराण करणारी गोष्ट आहे की, इतक्या मोठ्या संख्येने लोक (विशेषतः महिला) एका सामान्य वक्तव्यावर ट्रिगर होत आहे की, बलात्कार पीडितेला बलात्काराने आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे…’

 

 

एक्सवर स्वतःचा बचाव करत स्वरा म्हणाली, ‘अत्यंत भयंकर गुन्ह्याचा सामना केल्यानंतरही बलात्कार पीडितांना आपलं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, या गोष्टीमुळे कितीतरी स्त्री-पुरुष अस्वस्थ होतात, हे पाहूनच आश्चर्य वाटतं. यावर नंतरच्या एका ट्विटमध्ये स्वरा म्हणाली की, महिलेच्या आयुष्यापेक्षा तिच्या अब्रू आणि पावित्र्याला अधिक महत्त्व देणारी मानसिकता हेच ‘ऑनर किलिंग’चं म्हणजेच अब्रूच्या नावाखाली महिलांची हत्या होण्याचं मूळ कारण आहे.

‘हे विचार प्रचंड मागासलेले आणि भयानक आहे. जर असं काही पाकिस्तान किंवा अफगानिस्तान येथे होत असेल तर, आपण त्याला चुकीचं आणि वाईट समजून घेतो.. पण याच गोष्टीला ‘भारताची परंपरा’ असं नाव जोडून दिलं जातं… जर यावर एखादा झगमगाटी बॉलीवूड सिनेमा बनवला गेला, तर सुशिक्षित लोकही त्याचं समर्थन करण्यासाठी कसे पुढे येतात, ते फक्त पाहाच.

स्वरा भस्कर हिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

‘पद्मावत’ सिनेमातील ‘जौहर’च्या सीनबद्दल बोलताना स्वरा भास्कर म्हणाली, सिनेमा पाहिल्यानंतर तिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना एक खुलं पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये 800 महिलांच्या जौहरच्या सीनवर निशाणा साधला, या सीनची तुलना अभिनेत्रीने बलात्कार पीडितांसोबत केली आणि प्रश्न उपस्थित केला की, जर कोणत्या महिलेवर बलात्कार झाला असेल, तर तिचं आयुष्य संपायला पाहिजे? स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःला संपवणं किती योग्य आहे? बलात्कार होणं महिलेच्या आयुष्याचा अंत आहे का? असे प्रश्न स्वरा भास्कर हिने उपस्थित केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us