Swara Bhasker: स्वरा भास्कर कोणाच्या प्रेमात? फोटो शेअर करत दिली जाहीर कबुली

स्वरा भास्करच्या फोटोमधील 'मिस्ट्री मॅन' कोण? फोटोच असा पोस्ट केला की नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली!

Swara Bhasker: स्वरा भास्कर कोणाच्या प्रेमात? फोटो शेअर करत दिली जाहीर कबुली
Swara Bhasker
Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 09, 2023 | 12:22 PM

मुंबई: अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ट्विटरवर ती बरीच सक्रिय असून सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडत असते. आता स्वरा पुन्हा एकदा तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिने कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलं नाही. तर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत पहायला मिळतेय. मात्र त्याचा चेहरा त्यात दिसत नाही. या फोटोच्या कॅप्शनमध्ये स्वराने जे लिहिलं, ते वाचून नेटकरी तिला मजेशीर प्रश्न विचारत आहेत.

स्वरा भास्कर तिच्या डेटिंग लाइफबद्दल सहसा कधीच व्यक्त होत नाही. मात्र आता थेट तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. या फोटोमुळे नेटकऱ्यांना स्वराच्या लव्ह-लाइफविषयी कुतूहल निर्माण झालं आहे.

या फोटोमध्ये एका व्यक्तीच्या हातावर स्वराने डोकं टेकल्याचं पहायला मिळत आहे. मात्र यात दोघांचाही चेहरा स्पष्ट दिसत नाही. फक्त केस दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये स्वराने लिहिलं, ‘प्रेमासारखं काहीतरी..’

‘हा तुझा बॉयफ्रेंड आहे का’ असा सवाल एका युजरने स्वराला केला. तर ‘कदाचित तू मोठी बातमी जाहीर करणार आहेस वाटतं, आम्ही वाट बघतोय’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हे तुझं प्रेम असावं अशी आशा आहे’ असंही एका युजरने लिहिलं आहे. स्वराच्या या फोटोवरून अनेकांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

याआधी स्वरा भास्कर ही हिमांशू शर्माला डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र 2019 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. हिमांशूने ‘तनु वेड्स मनु’ चित्रपटात काम केलंय.