Sweta Keswani : हे मोठे स्टार माझ्या कमरेवर हात ठेवण्याऐवजी नको तिथे…प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
Sweta Keswani : अभिनेत्री श्वेता केसवानीनं नुकत्याच एका मुलाखतीत इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा अशा घटना उघड करतात ज्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. अनेक अभिनेत्रींनी मुलाखतीत त्यांनी सहन केलेल्या इंडस्ट्रीतील त्रासाबद्दल सांगितला आहे. अशातच आता, टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री श्वेता केसवानीनं मोठा खुलासा केला असून त्यांन खळबळ उडाली आहे. श्वेताचा आरोप आहे की, प्रसिद्ध अभिनेते तिच्या कमरेला स्पर्श करण्याऐवजी तिच्या नितंबांना स्पर्श करत असत.
लोक विचित्र पद्धतीनं भेटतात आणि मिठी मारतात
श्वेता केसवानीनं अलीकडेच सिद्धार्थ कन्ननला एक मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान, तिनं लोकांना भेटण्याच्या आणि मिठी मारण्याच्या पद्धतींबद्दल चर्चा केली. अभिनेत्रींनं सांगितलं की, जर कोणी अनोळखी व्यक्ती तिला भेटून मिठी मारत असेल, पण तिला त्यांचं वागणं आवडलं नाही, तर ती त्यांच्या जास्त जवळ जाणार नाही ती त्यांना समोरून मिठी न मारता बाजूने मिठी मारेल.
त्यानंतर सिद्धार्थने तिला ‘तारा’ या मालिकेबद्दल विचारलं.यावर अभिनेत्री म्हणाली की, ‘ताराच्या बाबतीत मला असं कोणी आठवत नाही. त्यातले काही जण माझे अभिनेते मित्र आहेत. इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाला त्यांची नावं आणि ते कोण आहेत हे माहीत आहे. पण आम्ही बोलू शकत नाही. उदाहरणार्थ, कमरेवर हात ठेवण्याऐवजी ते नितंबावर हात ठेवतात. मग मी त्यांना हात वर घ्यायला सांगायचे.’
सिद्धार्थने पुढे विचारलं की, ते फक्त फोटोंसाठी असं करतात का? यावर अभिनेत्री म्हणाली, ‘नाही. हे अगदी सामान्य आहे. जसं की, जर त्याने तुम्हाला ड्रिंकसाठी विचारलं, ‘तुम्हाला ड्रिंक हवंय का?’ तर तो नितंबावर हात ठेवतो आणि मी म्हणते की, आपण फक्त हात मिळवायला पाहिजे. त्यामुळे मी स्वतःची काळजी घ्यायला शिकले. आता मी काय करू शकते? असे लोक तुम्हाला सगळीकडेच भेटतात.’
दरम्यान, श्वेताच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘तारा’ या मालिकेतून केली. नंतर ती ‘देश में निकला होगा चांद’, ‘बा बहू और बेबी’ आणि ‘कहानी घर घर की’ सारख्या मालिकांमध्ये दिसली. ‘द मेमसाहिब’, ‘लव्ह इन नेपाळ’, ‘तौबा तौबा’, ‘बिन बुलाये बाराती’ सारखे चित्रपटही तिने केले.